मनोरंजन

कंगना रनौतच्या अंगरक्षकाला अटक

लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण, फसवणूक केल्याचा आरोप

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतचा वैयक्तिक अंगरक्षक कुमार हेगडेला मुंबई पोलिसांनी कर्नाटकात अटक केली. तो अनेक दिवसांपासून फरार होता. हेगडेला बलात्कार आणि फसवणुकीच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. पोलीस जेव्हा कुमार हेगडेच्या गावात गेले तेव्हा तो त्याच्या लग्नाची पत्रिका वाटत होता. त्याचवेळी पोलिसांनी त्याला अटक केली. मुंबईचे डीएन नगर पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

कुमार हेगडे विरोधात तक्रार करणारी महिला एक ब्युटीशियन आहे. कुमार हेगडे बऱ्याच दिवसांपासून संपर्कात न आल्याने तिने अखेर पोलिसांकडे जावून आपली व्यथा मांडली. विशेष म्हणजे हेगडेने आई आजारी असल्याचा बहाणा करुन ५० हजार रुपये घेतले. पण ते परत केले नाहीत, असाही आरोप पीडितेने केला आहे. तसेच त्याने लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्ती लैंगिक अत्याचार केला, असाही आरोप महिलेने तक्रारीत केला आहे.

पीडित महिलेने आपल्या तक्रारीत कुमार हेगडेला कधीपासून भेटले पासून ते शेवटची भेट कधी झाली याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. पीडिता हेगडेला आठ वर्षांपासून ओळखते. त्यांची आठ वर्षांपूर्वी ओळख झाली होती. गेल्यावर्षी जून महिन्यात कुमार हेगडेने तिला लग्नासाठी विचारलं होतं. पीडितेने तेव्हा भावनेच्या भरात होकार दिला होता. त्यानंतर आई आजारी असल्याचं सांगून कुमार कर्नाटकला निघून गेला. तसेच त्याने पीडितेकडून आईच्या उपचारासाठी पैसे हवेत असं सांगून ५० हजार रुपये घेतले. पण त्यानंतर तो एकदाही संपर्कात आला नाही, असा आरोप पीडितेने केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button