अर्थ-उद्योगतंत्रज्ञान

मायक्रोसॉफ्टकडून डिजिटल गतीला चालना देण्‍यासाठी हैदराबादमध्‍ये इंडिया डेटासेंटर रिजन स्‍थापन करणार

हैदराबाद – मायक्रोसॉफ्टने हैदराबाद, तेलंगणामध्ये त्‍यांचे नवीन डेटासेंटर रिजन स्‍थापित करण्‍याच्‍या त्‍यांच्‍या उद्देशाची घोषणा केली. ही धोरणात्‍मक गुंतवणूक मायक्रोसॉफ्टच्‍या ग्राहकांना क्‍लाऊड व एआय-सक्षम डिजिटल अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये भरभराट होण्‍यास आणि जगाच्‍या सर्वात मोठ्या क्‍लाऊड पायाभूत सुविधेचा भाग बनण्‍यास मदत करण्‍याप्रती असलेल्‍या कटिबद्धतेशी संलग्‍न आहे.

भारतभरात डिजिटल परिवर्तन, आर्थिक विकासाला चालना आणि सामाजिक प्रगतीसाठी व्‍यासपीठ म्‍हणून ग्राहकांची क्‍लाऊडकरिता मागणी वाढत आहे. आयडीसीच्‍या मते भारतातील मायक्रोसॉफ्ट डेटासेंटर रिजन्‍सनी २०१६ ते २०२० दरम्‍यान अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये ९.५८ डॉलर्स महसूलाचे योगदान दिले आहे. जीडीपीवर प्रभाव करण्‍यासोबत आयडीसी अहवालाने अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये १.५ दशलक्ष नोक-यांची भर झाल्‍याचा अंदाज व्‍यक्‍त केला, ज्‍यामध्‍ये १६९,००० नवीन कुशल आयटी नोक-यांचा समावेश आहे.

भारताचे कौशल्य विकास व उद्योजकता आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्‍हणाले, भारतातील लोक व व्‍यवसायांप्रती आजची कटिबद्धता देशाला जगातील डिजिटल लीडर्समध्‍ये स्‍थान मिळवून देईल. मायक्रोसॉफ्ट डेटासेंटर रिजन आपल्‍या डिजिटल अर्थव्‍यवस्‍थेला स्‍पर्धात्‍मक लाभ देते आणि आपल्‍या देशाच्‍या क्षमतेमधील ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे. क्‍लाऊड प्रत्‍येक उद्योग व विभागामध्‍ये परिवर्तन घडवून आणत आहे. स्किलिंगमधील गुंतवणूक भारताच्‍या विद्यमान व भावी कर्मचारीवर्गाला सक्षम करेल.

हैदराबाद डेटासेंटर रिजन भारतातील पुणे, मुंबई व चेन्‍नई या तीन प्रदेशांच्‍या विद्यमान नेटवर्कमधील नवीन भर असेल. ते उद्योग, स्‍टार्ट-अप्‍स, विकासक, शैक्षणिक व सरकारी संस्‍थांना क्‍लाऊड, डेटा सोल्‍यूशन्‍स, आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स (एआय) आणि कस्‍टमर रिलेशनशीप मॅनेजमेंट (सीआरएम) सह प्रगत डेटा सुरक्षितता असा संपूर्ण मायक्रोसॉफ्ट पोर्टफोलिओ देईल.

ग्राहकांच्‍या उच्‍च उपलब्‍धता व स्थिरतेप्रती मागण्‍यांची पूर्तता करण्‍यासाठी मायक्रोसॉफ्टने त्‍यांच्‍या सेंट्रल इंडिया डेटासेंटर रिजनमध्‍ये डिसेंबर २०२१ मध्‍ये अझुरे अव्‍हेलिबिलिटी झोन्‍स लाँच केले. यामुळे भूकंपीय क्षेत्राच्‍या आपत्तीजनक स्थितीमध्‍ये रिकव्‍हरी तरतूदी व कव्‍हरेजसह देशामध्‍ये डेटासेंटर्सचे सर्वात व्‍यापक नेटवर्क निर्माण होते.

विप्रोच्‍या चीफ ग्रोथ ऑफिसर स्टिफनी ट्रॉटमन म्‍हणाल्‍या, विप्रो व मायक्रोसॉफ्ट उद्योगांना व्‍यवसाय विकासाला चालना देण्‍यामध्‍ये, ग्राहक अनुभव वाढवण्‍यामध्‍ये आणि कनेक्‍टेड माहिती देण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी दोन दशकांहून अधिक काळापासून सहयोगाने काम करत आले आहेत. भारतातील मायक्रोसॉफ्टचे नवीन डेटासेंटर आमच्‍या सहयोगाला प्रगत करण्‍यामध्‍ये आणि संयोजित क्‍लायण्‍ट संबंधांसाठी विद्यमान नवोन्‍मेष्‍काराला चालना देण्‍यामध्‍ये मदत करेल. भारतीय उद्योग परिवर्तन करण्‍यासोबत क्‍लाऊड कम्‍प्‍युटिंगमधील त्‍यांचा सहभाग वाढवत असताना ही सेवा सर्व प्रकारचे विकासक व संस्‍थांना नवीन ग्राहक अनुभव निर्माण करण्‍यासाठी, त्‍यांच्‍या व्‍यवसायांना पाठिंबा देण्‍यासाठी आणि मोठ्या प्रमाणात नवोन्‍मेष्‍काराचा वापर करण्‍यासाठी महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा देईल.

हैदराबाद शहरामध्‍ये आणि संपूर्ण तेलंगणा राज्‍यामध्‍ये मायक्रोसॉफ्ट स्‍थानिक व्‍यवसायांना मायक्रोसॉफ्ट क्‍लाऊड सर्विससह नवनवीन संधी उपलब्‍ध करून देईल. मायक्रोसॉफ्ट शासनासाठी क्‍लाऊड, एआय, आयओटी व सायबर सिक्‍युरिटी सोल्‍यूशन्‍सच्‍या अवलंबतेला चालना देण्‍यासाठी तेलंगणा सरकारसोबत सहयोग करत आहे. यामध्‍ये नेक्‍स्‍ट जनरेशन तंत्रज्ञानामध्‍ये सरकारी अधिका-यांना अपस्किल करणे, तरूणींना सायबर शिक्षा उपक्रमाच्‍या माध्‍यमातून सायबर सुरक्षिततेमध्‍ये करिअर घडवण्‍यास साह्य करणे आणि ग्रामीण भागातील नोकरी शोधणा-यांना तंत्रज्ञान कौशल्‍यांसह सक्षम करण्‍यासाठी श्रम व रोजगार मंत्रालयासोबत डिजिसक्षम सारख्‍या स्किलिंग उपक्रमासह सहयोग करणे या प्रयत्‍नांचा समावेश आहे.

तेलंगणा सरकारचे नगरपालिका प्रशासन व शहरी विकास, उद्योग व वाणिज्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री केटी रामा राव म्‍हणाले, मला खूप आनंद होत आहे की, मायक्रोसॉफ्टने भारतातील त्‍यांच्‍या सर्वात मोठ्या डेटासेंटर गुंतवणूकीसाठी हैदराबादची निवड केली आहे. ही राज्‍यातील सर्वात मोठी प्रत्‍यक्ष विदेशी गुंतवणूक (एफडीआय) असणार आहे. मायक्रोसॉफ्ट व तेलंगणाचा मोठा इतिहास आहे. हैदराबादमध्‍ये जगातील सर्वात मोठे मायक्रोसॉफ्ट कार्यालय आहे आणि मला हे संबंध अधिक दृढ होताना पाहण्‍याचा आनंद होत आहे.

मायक्रोसॉफ्ट इंडियाचे अध्‍यक्ष अनंत महेश्‍वरी म्‍हणाले, क्‍लाऊड सर्विसेस व्‍यवसाय व शासनाच्‍या भविष्‍याला नवीन आकार देण्‍यामध्‍ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्‍यास आणि देशातील एकूण समावेशनाला चालना देण्‍यास स्थित आहेत. नवीन डेटासेंटर देशभरातील श्रमजीवी लोकांना साह्य करण्‍यासाठी मायक्रोसॉफ्टच्‍या क्‍लाऊड क्षमतांमध्‍ये वाढ करेल. तसेच हे डेटासेंटर नवीन उद्योग संधींना पाठिंबा देण्‍यासोबत महत्त्वपूर्ण सुरक्षितता व अनुपालन गरजांची देखील पूर्तता करेल. नवीन डेटासेंटर रिजियनमधून भारतातील लोक व संस्‍थांना अधिक प्रगती करण्‍यामध्‍ये सक्षम करण्‍याप्रती असलेले आमचे मिशन दिसून येते. आम्‍हाला या प्रमुख संपादनासाठी तेलंगणा सरकारसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे आणि आम्‍ही त्‍यांच्‍या पाठिंब्याचे मनापासून अभिनंदन करतो.

भारतातील आपल्‍या क्‍लाऊड डेटासेंटर उपस्थितीच्‍या विस्‍तारीकरणासह मायक्रोसॉफ्ट ग्राहक व भागीदारांना सक्षम करत आहे आणि सहयोगाने नाविन्‍यता आणत आहे. भारतातील मायक्रोसॉफ्टचे ग्राहक जसे जिओ, इन्‍मोबी, इन्‍फोसिस, टीसीएस, आयसीआयसीआय, बजाज फिनसर्व्‍ह, अपोलो हॉस्पिटल्‍स, महिंद्रा, डॉ. रेड्डीज लॅब्‍स, पिरामल, स्‍टेट बँक ऑफ इंडिया, फ्लिपकार्ट, पिडीलाइट व अ‍ॅमिटी यांना मायक्रोसॉफ्टच्‍या जागतिक स्‍तरीय क्‍लाऊड सेवांमधून लाभ होत आहे आणि हैदराबादमधील नवीन डेटासेंटर रिजियन भारताच्‍या वाढत्‍या क्‍लाऊड गरजांची पूर्तता करण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावेल.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button