अर्थ-उद्योगमनोरंजन

सयाजी शिंदे ‘ऑटो आय केअर’ ॲपचे ब्रॅण्ड अम्बॅसेडर

मुंबई : लॉकडाऊनचा अनिश्चित काळ असो किंवा शहर, रस्त्यात, महामार्गावर अचानक गाडी बंद पडल्यास मेकॅनिक, गॅरेजची मदत मिळवणे म्हणजे तारेवरची कसरत! पण वाहनचालकांच्या मदतीला आता ‘अपना भाई’ धावून आला आहे. हा ‘अपना भाई’ म्हणजे मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत ठसा उमटवणारे तसेच पर्यावरणासह इतर सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे लोकप्रिय कलाकार सयाजी शिंदे ! २४ x ७ कार रिपेअर प्लॅटफॉर्म ‘ऑटो आय केअर’ ॲप्लिकेशनने सयाजी शिंदे यांची ब्रॅण्ड अम्बॅसेडर पदी निवड करण्यात आली असल्याची घोषणा केली.

‘गाडी बंद, नो फिकर, ऑटो आय केअर है ना’ या नव्या मोहीमेअंतर्गत सयाजी शिंदे ‘अपना भाई’ म्हणून वाहनचालकांना प्रोत्साहित करत एका क्लिकवर मदत मिळवून देणाऱ्या आणि काळाची गरज बनलेल्या ‘ऑटो आय केअर’ या ई-गॅरेजचे महत्व अधोरेखित करताना दिसणार आहेत. गाडी बंद पडली, अपघात झाला किंवा इतर कोणत्या तांत्रिक समस्या आली, तर अशावेळी वाहनचालकांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी ‘ऑटो आय केअर’ हे हायटेक मोबाईल ॲप प्रत्येक परिस्थितीत वाहनचालकांच्या मदतीसाठी सोबत असेल, हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. सर्वसामान्य वाहनचालकांपासून ते गेल्या वर्षी झालेल्या लॉकडाऊनमध्ये पोलीस, ॲम्ब्युलन्स, डॉक्टर्स आदी अत्यावश्यक यंत्रणांना या ॲपने तात्काळ मदत मिळवून दिली आहे.

सयाजी शिंदे याची प्रतिमा, लोकप्रियता आणि त्यांचे सामाजिक क्षेत्रात असणारे योगदान पाहता ‘ऑटो आय केअर’ला विश्वास आहे की, ‘गाडी बंद, नो फिकर’ या नव्या मोहीमेच्या माध्यमातून सर्व वाहनचालकांना सुरळीत प्रवास आणि तात्काळ सेवा मिळवून देण्याचे ध्येय पूर्ण होईल. विविध जाहिराती, डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ही मोहीम राबवली जाणार आहे. ”सामाजिक मुद्द्यांबाबत जनजागृती करणाऱ्या मोहीम या नेहमी माझ्या जवळचा विषय आहेत. ‘गाडी बंद नो फिकर, ऑटो आय केअर है ना’ या मोहिमेच्या माध्यमातून वाहनचालकांना कोणत्याही परिस्थितीत तात्काळ मदत मिळवून देण्याचा महत्वाचा संदेश पोहोचविला जात असून तो वाखणण्याजोगा आहे. ‘अपना भाई’ या अनोख्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून मी हा संदेश पोहोचवत असल्याचा आनंद आहे.” अशा भावना सयाजी शिंदे यांनी व्यक्त केल्या. २०१९ साली सुरू झालेल्या या रोड साईड असिस्टन्स ॲपच्या माध्यमातून वाहनचालकांना मेकॅनिक मिळविण्यापासून ते ड्रायव्हर हायर करण्यापर्यंत अनेक सुविधा उपलब्ध होतात. ”प्रवासावेळी गाडी बंद पडली, इतर तांत्रिक समस्या आली आणि आजूबाजूला मदतीसाठी कोणीच नसणे ही प्रत्येक वाहनचालकासाठी आव्हानात्मक परिस्थिती असते. विशेषतः महामार्गांवर किंवा रात्रीच्या वेळी मदत मिळवणे कठीण. सध्याच्या अद्ययावत युगात या सगळ्या समस्यांवर मदत मिळवून देणारे एक मोबाईल ॲप असावे या दृष्टिकोनातून ‘ऑटो आय केअर’ची निर्मिती करण्यात आली. केवळ एका क्लिकच्या माध्यमातून २० मिनिटांत सेवा पुरविण्यावर आमचा भर आहे. प्रत्येक १० किमी अंतरावर २ गॅरेज उपलब्ध असून देशभरात ५५,००० हून अधिक लोकल गॅरेज, २,२८,००० किमीवर विस्तारलेली, २३८ राष्ट्रीय महामार्गांवर कार्यान्वित आणि देशातील ११०० शहरांमध्ये कार्यरत असणारे वाहतूक सेवेचे जाळे आम्ही विस्तारले आहे.” असे ‘ऑटो आय केअर’चे संस्थापक सागर जोशी म्हणाले. ”अलीकडे खासगी वाहनांचा वापर वाढत असून लॉकडाऊनच्या अनिश्चित काळात प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हे ॲप असणे काळाची गरज आहे. गेल्यावर्षी पोलीस, डॉक्टर्स, ॲम्ब्युलन्स आदी अत्यावश्यक यंत्रणांना या ॲपद्वारे मदत मिळाली आहे. ब्रॅण्ड अम्बॅसेडर सयाजी शिंदे यांच्या माध्यमातून आमच्या यंत्रणेचे उद्दिष्ट, ध्येय अधिकाधिक लोकांपर्यंत नक्कीच पोहोचेल .” अशा विश्वासही त्यांनी पुढे व्यक्त केला.

मोबाईल ॲप ऑटो सेक्टरमध्ये ब्रॅण्ड अम्बॅसेडर असणारे ‘ऑटो आय केअर’ हे पहिलेच ॲप्लिकेशन आहे. प्रवास करतेवेळी वाहनांच्या तांत्रिक समस्या, बॅट्री डाऊन, टोइंग, गाडीचा किरकोळ अपघात आदी कारणांसाठी तात्काळ सेवा पुरविणारे ‘ऑटो आय केअर’ वाहनचालकांसाठी उपयुक्त ॲप ठरत आहे. एम्पायर मीडियाद्वारे या मोहिमेची संकल्पना बनवण्यात आली आहे. ”वाहनचालकांच्या मदतीसाठी सदैव सोबत असणाऱ्या अपना भाईची प्रतिमा ही सयाजी शिंदे यांच्या प्रभावशाली व्यक्तिमत्वाशी मिळतीजुळती आहे. त्यांची बोलण्याची शैली, तत्परता आणि सामाजिक विषयांबाबत असणारी जाण पाहता अपना भाईच्या माध्यमातून या मोहिमेचा संदेश अधिकाधिक वाहनचालकांपर्यंत पोहोचण्यास निश्चितच मदत होईल.” असे एम्पायर मीडियाचे संस्थापक आशिष शिंदे म्हणाले.

वाहनचालकांना त्यांच्या जवळील गॅरेज, मेकॅनिक सोप्या पद्धतीने ट्रॅक करता यावे यासाठी या ॲपने इंटिग्रेटेड आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मोबाईल इंटरफेस सेवा कार्यान्वित केली आहे. यामुळे जवळील पेट्रोल पंप, इलेट्रीक वाहनांचे चार्जिंग स्टेशन, पे अँड पार्क अशा अनेक सुविधा शोधण्यास मदत होईल. मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरूसारख्या मेट्रो सिटीज ते गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, तामिळनाडू अशा अनेक भागात या ॲपचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button