नवी मुंबईतील ‘एनएमआयएमएस’मध्ये विविध अभ्यासक्रमासाठी ‘कॉमन एण्ट्रन्स टेस्ट’
नवी मुंबई : एनएमआयएमएस या अभिमत होणार असलेल्या विद्यापीठाने तसेच उत्तम शैक्षणिक लौकिक असलेल्या व दीर्घ वारसा असलेल्या संस्थेने नवी मुंबईत वाणिज्य, अर्थशास्त्र, इंजिनीअरिंग, तंत्रज्ञान, व्यवस्थापन आणि कायदा आदी विषयांतील पदवी अभ्यासक्रमांसाठी अर्ज मागवले आहेत. एनएमआयएमएस-एनपीएटी ही बीबीए, बीकॉम (ऑनर्स), बीएससी फायनान्स आणि बीएससी अर्थशास्त्र या अभ्यासक्रमांसाठी सामाईक प्रवेश परीक्षा आहे. एनएमआयएमएस-सीईटीमुळे (एनएमआयएमएस कॉमन एण्ट्रन्स टेस्ट) बीटेकसारखे (ऑनर्स) इंजिनीअरिंग अभ्यासक्रम आणि एमबीए टेक (बीटेक + एमबीए टेक) यांसारख्या तंत्रज्ञान व्यवस्थापन अभ्यासक्रमांना प्रवेश सोपा होतो. तर एनएमआयएमएस-एलएटीमुळे (विधी अभिक्षमता चाचणी) बीए, एलएलबी (ऑनर्स) आणि बीबीए, एलएलबी (ऑनर्स) अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुकर होतो. बीएससी (अप्लाइड स्टॅटिस्टिक्स अँड अॅनालिटिक्स) आणि बीबीए- हॉस्पिटॅलिटी ऑपरेशन्स अँड मॅनेजमेंट अभ्यासक्रमांसाठीही नोंदणी सुरु करण्यात आली आहे.
एसकेव्हीएमच्या एनएमआयएमएसचे कुलगुरू डॉ. रमेश भट या कार्यक्रमाच्या गुणवत्तेबद्दल म्हणाले, “इंडस्ट्री ४.० चे नेतृत्व करण्यास सुसज्ज अशा व्यावसायिकांची आज आपल्याला गरज आहे. यासाठी क्षेत्रातील ज्ञान आणि तंत्रज्ञानातील कार्यात्मक कौशल्य अपरिहार्य आहे. या नवीन परिस्थितीत विषयातील कौशल्याची सांगड व्यवहार्य दृष्टिकोनाशी व सॉफ्ट स्किल्सशी घालू शकणाऱ्या व्यावसायिकांची आवश्यकता आहे. वेगाने बदलणाऱ्या अर्थव्यवस्थेत याची गरज आहे. एनएमआयएमएस नवी मुंबईमध्ये आम्ही भविष्यकाळातील नेते, विचारवंत व समस्या सोडवणारे तयार करत आहोत. त्यासाठी त्यांना सर्वांगीण प्रशिक्षण देत आहोत आणि सिद्धांत व प्रत्यक्ष उपयोजन यांची सांगड घालत आहोत.”
एनएमआयएमएस नवी मुंबईचे संचालक डॉ. पार्थसारथी एन. मुखर्जी कॅम्पसबद्दल म्हणाले, “एनएमआयएमएस नवी मुंबईची गणना भारतातील सर्वोत्तम शिक्षणसंस्थांमध्ये होते आणि ते योग्यही आहे. आमच्या काळजीपूर्वक विकसित केलेल्या अभ्यासक्रमाला प्रगतीशील व नवोन्मेषकारी अध्ययनशास्त्राची जोड आहे. याचे अध्यापन कुशल अध्यापक करतात. जागतिक दर्जाच्या संरचनेने युक्त असा कॅम्पस् नैसर्गिक, सुंदर आणि प्रसन्न वातावरणात आहे. यामुळे अध्ययनात मदत होते. नवी मुंबईच्या उगवत्या व्यावसायिक केंद्रामध्ये हा कॅम्पस् आहे. भारताची आर्थिक राजधानी मुंबईपासून हा कॅम्पस् जवळ आहे. अतिथी व्याख्याने ते ऑनफील्ड प्रकल्प अशा अनेक मार्गांनी संस्था विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राची ओळख करून देते.”
कार्यक्रमाचे तपशील
एनएमआयएमएस-एनपीएटी २०२१ – बीबीए, बीकॉम (ऑनर्स), बीएससी फायनान्स आणि बीएससी इकोनॉमिक्स
अर्हता: अर्जदाराने कोणत्याही शाखेतून मान्यताप्राप्त बोर्डाची १०+२ किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि त्याला किमान ६० टक्के गुण असावेत. त्याचप्रमाणे इयत्ता १२वी मध्ये गणित आणि/किंवा संख्याशास्त्र हा विषय असावा. अर्ज करण्यासाठी क्लिक करा- www.nmimsnpat.in
एनएमआयएमएस-सीईटी २०२१ – कम्प्युटर सायन्स आणि बिझनेस सिस्टममध्ये बीटेक (ऑनर्स), कम्प्युटर, कम्प्युटर इंजिनीअरिंग आणि माहिती तंत्रज्ञानात एमबीए टेक (बीटेक + एमबीए टेक).
अर्हता: बीटेक (ऑनर्स) आणि एमबीए (टेक) या अभ्यासक्रमांसाठी पात्र ठरण्यासाठी अर्जदाराने विज्ञान किंवा विज्ञान व्होकेशनल या शाखांतून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित (पीसीएम) या विषयांसह १०+२ किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी व पीसीएममध्ये किमान ५० टक्के गुण मिळवलेले असावेत. अर्ज करण्यासाठी क्लिक करा- www.nmimscet.in
एनएमआयएमएस-एलएटी २०२१- बीए, एलएलबी (ऑनर्स) आणि बीबीए, एलएबी (ऑनर्स)
अर्हता: उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डाची १०+२ किंवा समकक्ष परीक्षा कोणत्याही शाखेतून उत्तीर्ण केलेली असावी आणि यात त्याला किमान ५० टक्के गुण मिळालेले असावेत. अर्ज करण्यासाठी क्लिक करा- www.nmimslat.in/
बीएससी (अप्लाइड स्टॅटिस्टिक्स अँड अॅनालिटिक्स) अभ्यासक्रम
अर्हता: उमेदवाराने १०+२ किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. यात आयबी पदविकेचाही समावेश होतो (आयबी प्रमाणपत्र पात्र नाही). १२वी इयत्तेत गणित/संख्याशास्त्र/गणित आणि संख्याशास्त्र हे अनिवार्य विषय असावेत आणि कोणत्याही शाखेतून (विज्ञान/वाणिज्य/गणित विषय असल्यास कला) १२वीला ५० टक्के मार्क्स असावेत. आयबी पदविकेच्या अभ्यासक्रमात गणित/गणित व संख्याशास्त्र शालेय व उच्चमाध्यमिक स्तरावर असेल तरच पदविका ग्राह्य धरली जाईल.
अर्ज करण्यासाठी क्लिक करा- https://science.nmims.edu/academics/programs/bsc-applied-statistics-and-analytics/
बीबीए- हॉस्पिटॅलिटी ऑपरेशन्स अँड मॅनेजमेंट
अर्हता: उमेदवाराने १०+२ किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण करणे व त्यात किमान ५० टक्के गुण मिळवले अनिवार्य आहे. किंवा इंजिनीअरिंगची पदविका किमान ५० टक्के गुणांसह प्राप्त केलेले उमेदवारही अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. अर्ज करण्यासाठी क्लिक करा- https://nmims.secure.force.com/SHM_BBAHM_Login