फोकसशिक्षण

एमपीएससीची अर्ज प्रक्रिया अचानक स्थगित

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी दरवर्षी अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत असते. ही परीक्षा दिल्यानंतर अनेकांना सरकारी अधिकारी होण्याची संधी मिळते. यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावे लागतात. मात्र एमपीएससीनं नुकतीच एक महत्त्वाची घोषणा केली आहे. येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अर्ज करण्याची ऑनलाईन प्रोसेस तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

मुंबई राज्यात कोरोना काळात आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी) कडून अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच अनेक परीक्षा लांबणीवर गेल्या यामुळे उमेदवारांना नाहक त्रासही सहन करावा लागला आहे. काही उमेदवारांनी आक्रमक पवित्रासुद्धा घेतला होता. आता तर एमपीएससीची अर्ज भरण्याची प्रक्रियाच स्थगित करण्यात आल्यामुळे अनेक उमदेवारांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तर अनेकांची गैरसोय झाली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवते. स्पर्धा परीक्षांचे आयोजन करत असते. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेला उमेदवार सरकारी अधिकारी म्हणून काम करत असतो. परंतु गेल्या २ वर्षांपासून एमपीएससीच्या अनेक पदांवर भरती प्रक्रिया रखडल्या आहेत. आता अर्ज करण्यावरही स्थगिती आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यामध्ये काही तांत्रिक अडचणी येत असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्राल लोकसेवा आयोगाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन उमेदवारांना माहिती दिली आहे. मध्ये एमपीएससीने असे म्हटलं आहे की, प्रसिद्ध सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात येत आहे. तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर पुन्हा सूचना देण्यात येईल तसेच सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यास पुरेशी मुदत देण्यात येईल, अशी माहिती एमपीएससीकडून देण्यात आली आहे.

एमपीएससी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमधील तांत्रिक अडचण दूर करत नाही तोपर्यंत कोणत्याही उमेदवाराला अर्ज करता येणार नाही. यामुळे उमेदवारांची मात्र गैरसोय होणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची पक्रिया सुरु करण्यात आली तेव्हापासूनच आयोगाला तांत्रिक अडचणी येत होत्या. उमेदवारांनीही वारंवार तक्रारी केल्यानंतर आयोगाने अर्ज करण्याची प्रक्रिया स्थगित केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग तांत्रिक अडचणी दूर करुन पुन्हा विद्यार्थ्यांना अर्ज करण्याबाबत माहिती देणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button