Top Newsअर्थ-उद्योगफोकस

नॅशनल स्टॉक एक्सचेंज घोटाळा: आनंद सुब्रम्हण्यमला अटक

चेन्नई : नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि एनसईच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आनंद सुब्रम्हण्यम याला चेन्नईतून सीबीआयने अटक केली आहे. रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. आनंद सुब्रम्हण्यम यांच्यावर अनेक आरोप आहेत.

सीबीआयने आनंद सुब्रम्हण्यमची तीन दिवस चौकशी केली होती. चित्रा रामकृष्ण या एप्रिल २०१३ ते डिसेंबर २०१६ या काळात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. या काळात त्यांनी शेअर बाजाराशी संबंधित गोपनीय माहिती हिमालयातील एका योगीला पुरवली असल्याचा ठपका सेबीने ठेवला होता.

केंद्रीय तपास एजन्सी सीबीआयने को-लोकेशन फॅसिलिटी प्रकरणात दिल्लीस्थित ओपीजी सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेडचे मालक आणि प्रवर्तक संजय गुप्ता यांच्याविरुद्ध स्टॉक मार्केटच्या बातम्यांपर्यंत लवकर प्रवेश मिळवून नफा मिळवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. सीबीआय त्याच प्रकरणात सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) आणि एनएसई, मुंबईचे अज्ञात अधिकारी आणि इतर अज्ञात व्यक्तींची चौकशी करत होते.

सेबीने दिलेल्या माहितीनुसार चित्रा या हिमालयातील एका योगी बाबांच्या सल्ल्यानुसार सर्व निर्णय घेत होत्या. या बाबांच्या सल्लानंतरच त्यांनी आनंद सुब्रहमण्यम यांना एक्सचेंजचे ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून नियुक्त केलं होतं. सेबीने चित्रा रामकृष्ण आणि यात सामिल इतर काही व्यक्तीबाबत शुक्रवारी एक आदेश काढत ही माहिती दिली. सेबीकडून या सर्वांना दंड देखील ठोठावण्यात आला आहे.

चित्रा रामकृष्ण आणि सुब्रहमण्यम यांना तीन वर्षांसाठी बाजारातील सर्व कामाकाजात सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे. सेबीने यासह नॅशनल स्टॉक एक्सचेंजला रामकृष्ण यांच्याकडून १.५४ कोटी रुपयांचा स्थगित बोनस आणि अतिरिक्त रजेच्या बदल्यात दिलेले २.८३ कोटी रुपये जप्त करण्याचे निर्देश दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button