Top Newsस्पोर्ट्स

महिला हॉकी संघाचा स्वप्नभंग, ऑलिम्पिकमध्ये भारताचे कांस्यपदक हुकले!

टोक्यो : महिला हॉकीच्या इतिहासात ऑलिम्पिकमधीलं पहिलं वहिलं पदक पटकवण्याच्या आशा धुळीला मिळाल्या. भारतीय महिला हॉकी संघाचं कांस्य पदकाचं स्वप्न भंगलं आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये महिला हॉकी संघाला कांस्य पदकाची कमाई करण्यात यश मिळालं नाही. राणी रामपालच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला ब्रिटन संघाने ४-३ ने पराभूत केलं.

भारत आणि ग्रेट ब्रिटनमध्ये कांस्य पदकासाठी हा सामना पार पडला. सामन्याच्या पहिला मिनिटापासूनच दोन्ही संघांनी आक्रमक रुप धारण केलं होतं. पहिला क्वार्टर ग्रेट ब्रिटनने गाजवला. परंतु या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आलं. ब्रिटनने दुसऱ्या क्वार्टरची शानदार सुरुवात केली. सामन्याच्या १६ व्या मिनिटाला ब्रिटनने पहिला गोल केला. एली रेयारने फील्ड गोल केला. त्यामुळे भारत ०-१ ने पिछाडीवर पडला. तर २४ व्या मिनिटाला पुन्हा एकदा ब्रिटनने दुसरा गोल केला आहे. साराह रॉबर्टसनने रिवर्स शॉटद्वारे हा गोल केला.

ब्रिटनने दोन गोल केल्यानंतरही भारताची टीम जराही विचलित झाली नाही. गुरजीत कौरने टीम इंडियाचं सामन्यात पुनरागमन करुन दिलं. तिने लागोपाठ दोन गोल केले. गुरजीतने दोन्ही गोल पेनल्टी कॉर्नरद्वारे केले. गुरजीतने २ मिनिटांच्या आतमध्ये हे दोन्ही गोल केले. तिने पहिला गोल २५ व्या मिनिटाला केला तर दुसरा गोल २६ व्या मिनिटाला केला.

ब्रिटन भारतावर पूर्णपणे हावी झालेलं असताना भारताच्या महिला संघाने सामन्यात जोरदार पुनरागमन केलं. पहिल्या क्वार्टरनंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताचा शानदार खेळ मिळाला. भारताने आणखी एक गोल केला. वंदना कटारियाने तिसरा गोल करुन सामन्यात चुरस आणली.

ब्रिटनने तिसऱ्या क्वार्टरची आक्रमक सुरुवात केली. पहिल्या दोन क्वार्टरसारखीच ब्रिटेनने या क्वार्टरची देखील आक्रमक सुरुवात केली. ब्रिटनने ३२ व्या मिनिटाला गोल केला. लागोपाठ ब्रिटनने तिसराही गोल केला. ब्रिटनकडून वेबने ३५ व्या मिनिटाला गोल करत आपल्या संघाला भारताशी बरोबरी करुन दिली. यानंतर भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला परंतु गुरजीत कौरला गोल करण्यात अपयश आलं.

तिसरा क्वार्टर बिनदिक्कतपणे ब्रिटनच्या नावावर राहिला. ब्रिटनने या क्वार्टरमध्ये एक गोल केला. या क्वार्टरमध्ये गोलकीपर सविता पुनियाने शानदार बचाव केले. ब्रिटनकडून डायरेक्ट शॉटचे प्रहार केले गेले परंतु सविता पुनियाने खूप सुंदर डिफेन्स केले. तिसऱ्या क्वार्टरनंतर दोन्ही संघांचा स्कोअर आहे ३-३ होता. चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीला ब्रिटनने चौथा गोल केला. या गोलसह ब्रिटनने ४-३ ने आघाडी मिळवली. सामन्याच्या उर्वरित काही मिनिटे अतिशय थरार पाहायला मिळाला. परंतु भारताला गोल करण्यात अपयश आलं. सरतेशेवटी ब्रिटनने भारताला ४-३ ने पराभूत करत ऐतिहासिक विजय मिळवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button