
मुंबई : दिल्ली घडामोडीनंतर भेट राज्यातील महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्पष्टच बोलले. खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील राजकारण आणि विविध विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारला ५ वर्षे कुठलाही धोका नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात गेल्या १० दिवसांत तीनवेळा बैठक झाली. पवार यांच्या निवासस्थानी काल विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर आज प्रशांत किशोर पुन्हा शरद पवारांना भेटले आहेत. त्यामुळे, देशासह राज्यातही राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यातच, मुख्यमंत्र्यांनी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचा निर्णय रद्द केल्याने महाविकास आघाडीत आलबेल नसल्याचं बोललं जात आहे. मात्र, खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
मा.श्री.शरद पवार यांना भेटलो. दिल्ली महाराष्ट्रातील घडामोडींवर चर्चा
झाली. महाराष्ट्र सरकारच्या स्थिरते संदर्भात त्यांच्या मनात शंका दिसत नाही.
उद्धव ठाकरे पाच वर्षाचा कालावधी पुर्ण करतील. ते मुख्यमंत्री म्हणून लोकप्रिय आहेत असे श्री.पवार म्हणाले. @PawarSpeaks @OfficeofUT— Sanjay Raut (@rautsanjay61) June 23, 2021
खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील राजकारण आणि विविध विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारला ५ वर्षे कुठलाही धोका नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. ”मी शरद पवार यांना भेटलो. दिल्ली-महाराष्ट्रातील घडामोडींवर चर्चा झाली. महाराष्ट्र सरकारच्या स्थीरतेसंदर्भात त्यांच्या मनात शंका दिसत नाही. उद्धव ठाकरे पाच वर्षाचा कालावधी पूर्ण करतील, ते मुख्यमंत्री म्हणून लोकप्रिय आहेत, असे पवारांनी म्हटल्याचे, राऊत यांनी सांगतिलं.
शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट, त्यानंतर पवारांच्या घरी पार पडलेली विरोधकांची बैठक यानंतर तिसऱ्या आघाडीचा विषय चर्चेत आला. काँग्रेस, भाजपेतर पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न पवारांकडून सुरू आहे का, अशी चर्चादेखील सुरू झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे पवार राष्ट्रपती पदासाठी मोर्चेबांधणी करत आहेत का, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. त्यावर आम्हाला संख्याबळाची कल्पना आहे. त्यामुळे राष्ट्रपती पदासाठीची उमेदवारी हा काही विषय नाही, असं शरद पवारांनी सांगितले.




