ठाकरे सरकार कोकणी माणसाला अंतर देणार नाही : वडेट्टीवार

मुंबई : तौत्के चक्रीवादळात महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मोठे आर्थिक आणि नैसर्गिक संपत्तीचे नुकसान झाले. याच सर्वाधिक फटका कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग भागाला बसला. आंबा बागायतदार आणि मच्छीमार यांचे रायगड जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार रायगडचा पाहणी दौरा करत आहेत. यावेळी वड्डेटीवार म्हणाले की, कोकणी माणसाला महाविकास आघाडी सरकारने कधीच अंतर दिले नाही आणि वाऱ्यावरही सोडले नाही. मागच्या वर्षी निकष बदलून मदत केली. फळबागा, घरांचं नुकसान झाल होत त्यांना सगळ्यांना मदत केली. परंतु त्यावेळेस पोल्ट्री व्यवसाय यातून सुटला होता, परंतु यावेळेस पोल्ट्रीचाही समावेश या नुकसानीमध्ये करण्याचे ठरवले आहे. नुकसानीच्या मदतीच्या संदर्भात उद्या मुख्यमंत्री उद्या ठाकरे यांचा कोकण दौरा झाल्यानंतर आम्ही पॅकेजची घोषणा करु, असेही त्यांनी जाहीर केले.
तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवी पुनर्वसन धोरण आणले जाणार आहे. यापूर्वी आम्ही नवीन पुनर्वसन धोरणाची तयारी करत कॅबिनेट पुढे नेले होते. मात्र काही मंत्र्यांनी त्यामध्ये दुरुस्ती सुचवल्या आहेत. हे धोरण कसे असावे हे कॅबिनेटने मंजूर केल्यानंतर कळेल. पण जिथे भूस्खलन होते किंवा वादळ, त्सुनामी, चक्रीवादळ येते अशा ठिकाणच्या लोकांना तात्काळ हलवण्याची गरज आहे. आणि त्यांचे पुनर्वसन जिल्ह्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली व्हावे यासाठी जिल्हाधिकारी मागतिल तो निधी जिल्ह्याधिकाऱ्यांकडे दिला गेला पाहिजे, यासाठी सोप्पे धोरण अवलंबत प्रत्येक अधिकार जिल्ह्याला देत पुर्नवसन धोरण राबवले पाहिजे. कारण फाईल मंत्रालयात आली की अडकते, ते तिथे न अडकला जिल्हा स्तरावर तो निर्णय व्हावा यासाठी असे सोप्प धोरण आम्ही आणतो आहोत, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना सरकारने अद्याप मदत जाहीर केली नाही असे म्हणत ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले होते. या टीकेला उत्तर देत विजय वडेट्टीवार म्हणाले की, त्याशिवाय विरोधी पक्षाला कामच नाही, वस्तुस्थिती न बघता सुसाट आरोप करायचे एवढेच काम त्यांच्याकडे आहे. कारण ७.७३ कोटी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी कोकणात गेल्या वेळेच्या निसर्ग चक्रीवादळादरम्यान दिला. ही मदत मिळालीच. यात राहिला असेल एखाद दुसरा माणूस ज्याचे पंचनाम्यातून नाव सुटले असेल. पंचनामे करत असताना प्रशासन असेल किंवा त्या खाली काम करणारी टीम असते त्यांचाकडून नाव सुटले असेल. पण तशी पत्रं किंवा माहिती आली की आम्ही लगेच मदत करतो. परंतु सरसकट काहीच मिळाले की नाही हे कोकणी जनतेला माहिती आहे. कारण कोकणी जनता खोटे बोलणाऱ्यांना अजिबात सहन करत नाही म्हणून जे दिलं ते आहे निकष बदलून दिला. ९५ हजार केंद्राचे निकष होते एचडीआरएफचे. आम्ही दीड लाख रुपये घराला दिले. फळबागांसाठी ५० हजार रुपये दिले. फळबागांचा निकष काय आहे. ६,५०० किंवा ६,८०० रुपये होता, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.




