Top Newsराजकारण

ठाण्यात मुसळधार पावसात काँग्रेसचे एसआयआर अभियान प्रशिक्षण

ठाण्यातील प्रत्येक बूथ सक्षम करणार : राहुल पिंगळे

ठाणे (प्रतिनिधी) : आगामी राजकीय घडामोडी आणि संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने एसआयआर (SIR) अभियानांतर्गत आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिराला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुसळधार पाऊस सुरू असतानाही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संघटना मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात प्रशिक्षक डॉ. निमिष साने यांनी अभियानाची उद्दिष्टे, बूथस्तरावरील नियोजन, मतदारांशी प्रभावी संवाद, संघटनात्मक शिस्त आणि आगामी कार्यपद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान कार्यकर्त्यांनी विविध प्रश्न उपस्थित करत अभियानाच्या अंमलबजावणीबाबत सखोल चर्चा केली.

प्रारंभी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून त्यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संघटना अधिक बळकट करण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले.

शिबिरात BLA-2 पदाधिकारी, विभागीय समन्वयक आणि मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रशिक्षणामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी संघटनात्मक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

ठाण्यातील प्रत्येक बूथ सक्षम करणार!

प्रतिकूल परिस्थितीतही कार्यकर्ते ज्या निष्ठेने आणि शिस्तीने प्रशिक्षणासाठी उपस्थित राहिले, त्यातून ठाणे काँग्रेसची संघटनात्मक ताकद स्पष्ट होते. प्रत्येक बूथ सक्षम करणे, कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणे आणि जनतेशी सातत्याने संवाद ठेवणे हेच आमचे पुढील ध्येय आहे. आगामी काळात अशा प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन सातत्याने करण्यात येईल, असा विश्वास काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button