आरोग्यराजकारण

गुजरातमध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या आकडेवारीत मोठी हेराफेरी!

७१ दिवसांत १.२३ लाख मृत्यू प्रमाणपत्रे तयार, सरकारी आकडा मात्र ४ हजार!

गांधीनगर : गुजरातमध्ये अहमदाबाद, सूरत, राजकोट, भावनगर, जामनगर यांसारख्या जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती अधिक गंभीर होत चालली असून मृत्यूदर देखील वाढताना दिसतोय. कोरोना रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शवगृहात मृतदेहांची रांग लागली असल्याचे सांगितले जात आहे. तर असे असतानाही सरकारकडून मृतांचा खरा आकडा लपविण्यात येत आहे. एका दैनिकाने गुजरातमधील मृतांच्या आकडेवाडीसंदर्भात एक बातमी दिली आहे. गुजरातमधील १ मे ते १० मेपर्यंतच्या मृत्यू प्रमाणपत्राची माहिती घेतल्यास धक्कादायक आकडेवाडी समोर आली आहे.

या आकडेनुसार, राज्यातील ३३ जिल्ह्यांमध्ये ७१ दिवसांत १ लाख २३ हजार ८७१ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, सरकारी आकडेवाडीनुसार कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या फक्त ४ हजार २१८ एवढीच दाखवण्यात येत आहे. त्यामुळे, ७१ दिवसांत सव्वा लाख लोकांचा जीव कसा गेला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील मृत्यू प्रमाणपत्रांच्या आकडेवाडीनुसार यंदाच्या मार्च महिन्यातच २६ हजार २६, एप्रिल महिन्यात ५७ हजार ७९६ आणि मे महिन्याच्या सुरुवातीच्या १० दिवसांत ४० हजार ४१ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या आकडेवारीसोबत यंदाची तुलना केल्यास मोठी तफावत जाणवते. मार्च २०२० मध्ये २३ हजार ३५२ एप्रिलमध्ये २१ हजार ५९१ आणि मे २०२० मध्ये १३ हजार १२५ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी ७१ दिवसांत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या दुप्पट असल्याचे सांगितले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button