Top Newsस्पोर्ट्स

हॉकीत बेल्जियमचा ५-२ ने विजय; भारताची निराशा, आता कांस्यपदकाची आशा

टोक्यो : टोक्यो ऑलिम्पिकमधल्या हॉकीच्या रोमहर्षक उपांत्य सामन्यात बेल्जियमने भारताचा ५-२ ने पराभव केला आहे. बेल्जियमने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. भारतीय संघाचं सुवर्णपदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. मात्र, तरीही संघ कांस्यपदकाचा दावेदार आहे.

बेल्जियमने सामन्याच्या सुरुवातीपासून भारताला दडपणाखाली खेळायला लावलं. सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला बेल्जिअमने गोल केला. भारतानेही लगोलग गोल करुन बेल्जियमशी बरोबरी केली. लगोलग भारताने दुसरा गोल केला. पण त्यानंतर बेल्जियमने भारताला गोल करुच दिला नाही. बेल्जियमचा संघ प्रत्येक वेळी भारताला वरचढ ठरला. भारताने बेल्जियमशी दोन हात करण्याच्या चांगला प्रयत्न केला. पण अखेर बेल्जिअमने भारताचा ५-२ असा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश मिळवला.

बेल्जियम हा जगातला एक क्रमांकाचा संघ आहे. भारताने पहिल्या सत्रात चांगला खेळ केला, पण नंतरचे तीन सत्र गमावले. विशेषतः प्रतिस्पर्ध्याला मोठ्या संख्येने पेनल्टी कॉर्नर देत वरचढ होण्याची संधी दिली आणि पराभव भारतीय संघाने पराभव ओढून घेतला आहे. पहिल्या सत्रात भारतीय संघाने बेल्जियमला २-१ असं पिछाडीवर टाकले होते. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघ २-२ अशा बरोबरीवर होते. या सत्रात बेल्जियमला अधिक पेनल्टी कॉर्नर मिळाले होते यावर भारतीय संघाला लगाम घालणे आवश्यक आहे. पण, ४१ वर्षांनंतर भारताची ऑलिम्पिकमध्ये प्रथमच चांगली कामगिरी झाली हे विसरता येत नाही.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सामन्याच्या पहिल्या सत्रात बेल्जियमने एक गोल करुन आघाडी घेतली होती, परंतु काही वेळातच भारताने २-१ ने आघाडी घेतली आणि बेल्जियमचे आव्हान संपुष्टात आणले होते. यानंतर मात्र बेल्जियमने भारताला गोल डागण्याची एकही संधी दिली नाही. या सामन्यात बेल्जियमला १४ पेनल्टी कॉर्नर मिळाले याचा बेल्जियमने उत्तम फायदा घेत भारताचे आव्हान संपुष्टात आणले आहे.
भारतीय संघाचं सुवर्णपदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. मात्र, तरीही संघ कांस्यपदकाचा दावेदार आहे. भारताने पहिल्या हाफमध्ये चांगला खेळ केला. तर बेल्जियम शेवटच्या क्वार्टरमध्ये भारताला खूपच वरचढ ठरला. पेनल्टी कॉर्नर हे भारताच्या पराभवाचे प्रमुख कारण आहे. भारताला आता कांस्य पदकासाठी खेळावं लागणार आहे. भारतीय संघ कांस्यपदकासाठी जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पराभूत संघाचा सामना करेल. उपांत्य सामन्यात विजय मिळवता आला नाही पण आता भारतीय संघाने कांस्य पदक तरी जिंकावं, अशीच अपेक्षा भारतीय चाहते करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button