Top Newsराजकारण

भाजपमध्ये आल्यापासून सगळं निवांत; शांत झोप, चौकशीचा त्रास नाही : हर्षवर्धन पाटील

पुणे: भारतीय जनता पक्षाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून वारंवार करण्यात येतो. तर भाजपकडून कायम या आरोपांचा इन्कार केला जातो. त्यात आता भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या एका विधानाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. पाटील यांनी दोनच वर्षांपूर्वी काँग्रेसचा हात सोडून कमळ हाती घेतलं.

मिश्किल विधानांसाठी ओळखल्या जाणाऱ्या पाटील यांनी काल मावळमधील एका कार्यक्रमात एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. आपण काँग्रेस सोडून भाजपमध्ये का आलो, या प्रश्नाचं उत्तर यावेळी पाटील यांनी दिलं. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे नेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री बाळा भेगडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके उपस्थित होते.

परिस्थिती गमतीशीर आहे. आम्हाला भारतीय जनता पक्षात जावं लागलं. स्टेजवर एकानं बसल्या बसल्या विचारलं भाजपमध्ये का गेलात..? मी त्यांना म्हटलं, हे मला विचारण्यापेक्षा आपल्या नेत्याला विचारा हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये का गेला? सध्या सगळं मस्त आहे, निवांत आहे. चौकशी वगैरे काही नाही. शांत झोप लागते, असं पाटील म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button