राजकारण

मनसे नेते अविनाश जाधव यांना अटक

कल्याण : मनसेचे पालघर-ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांना अटक करण्यात आली आहे. जमावबंदी आदेश लागू असताना गर्दी केल्याचा ठपका जाधवांवर ठेवण्यात आला आहे. अविनाश जाधवांसह काही कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं.

अविनाश जाधव हे मलंगगडावर आरती करण्यासाठी जाणार होते. मात्र कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी त्यांना काकडवाल गावाजवळ अडवलं आणि नेवाळी पोलीस चौकीत आणलं. यावेळी अविनाश जाधव यांच्यासोबत मनसेचे प्रमुख पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. उल्हासनगर परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांनी जाधव यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर अविनाश जाधव यांना नेवाळी पोलीस ठाण्यातून उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. अखेर हिललाईन पोलिसांनी अविनाश जाधव यांना अटक केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button