Top Newsराजकारण

मालमत्ता कर माफ करण्याच्या घोषणेनंतर फडणवीसांचा टोला ‘देर आए दुरुस्त आए…’

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना उद्देशून भाषण केले. आपल्या भाषणात मुख्यमंत्री कोरोना निर्बंधाबाबत बोलतील, असेच अनेकांना वाटत होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी नगर विकास विभागाच्या अनुषंगाने संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी सर्वसामान्य मुंबईकरांना मोठी भेट दिली असून ५०० चौ.फुटापर्यंतच्या घरावरील मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय जाहीर केला. आता, या निर्णयावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. देर आए दुरूस्त आये… असे फडणवीस यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या घोषणेनंतर यंदाच्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. फडणवीसांनी शेअर केलेल्या ६.१२ मिनिटांच्या व्हिडिओत त्यांनी मुंबई महापालिकेवर भाष्य केलं होतं. तसेच, 2017 मध्ये शिवसेनेनं जाहीरनाम्यात ५०० चौरस फुटापर्यंत टॅक्स माफ करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, लोकांच्या हाती भोपळा दिला, त्यातला छोटो कंपोनंट माफ केल्याची आठवण फडणवीसांनी करून दिली. तसेच, लवकरच याबाबत निर्णय घेण्याचीही मागणी केली होती. विशेष म्हणजे फडणवीस यांनी हा व्हिडिओ शेअर करत २०१७ चे वचन पूर्ण करण्यासाठी अखेर २०२२ हे निवडणुकीचे वर्ष उजाडले, दे आए दुरुस्त आए… असे म्हणत शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.

मुंबईकर म्हटल्यावर मुंबईकरांनी काय फक्त करच भरायचे का? मुंबईकरांना सेवा देखील तितक्याच चांगल्या मिळाल्या पाहिजेत या उद्देशातून आणि शिवसेनेनं वचननाम्यात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आज सरकारनं मुंबईतील ५०० स्केअर फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. मुंबईतील ५०० स्वेअर फुटांखालील घरांवरील मालमत्ता कर माफ करण्याच्या निर्णयाला अखेर आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आणि निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचेही आदेश प्रशासनाला दिले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button