
मुंबई : क्रूझ ड्रग्स प्रकरणात आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. आता एनसीबीने या प्रकरणात सुपरस्टार शाहरुख खानच्या ड्रायव्हरला चौकशीसाठी बोलावले. सध्या एनसीबी कार्यालयात किंग खानच्या ड्रायव्हरची चौकशी सुरू आहे.
या प्रकरणात ही मोठी घडामोड आहे. आतापर्यंत खान कुटुंब किंवा त्याच्याशी संबंधित कोणत्याही व्यक्तीची चौकशी झालेली नाही. एनसीबी किंग खानच्या ड्रायव्हरला प्रश्न विचारत आहेत. हे प्रश्न आर्यन खानशी संबंधित आहेत. आर्यन खान सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. आर्यन खानला ८ ऑक्टोबर रोजी तुरुंगात हलवण्यात आले. हा दिवस होता त्याची आई गौरी खानचा वाढदिवस. आर्यन खानला न्यायालयाकडून जामीन मिळेल अशी खान कुटुंबियांना आशा होती. पण तसे घडले नाही. आर्यनला त्याच्या आईच्या वाढदिवशी रात्र तुरुंगात घालवावी लागली. आर्यनसह उर्वरित आरोपींचा जामीन अर्जही फेटाळण्यात आला. आता लवकरच आर्यन खानचे वकील सतीश मानशिंदे सत्र न्यायालयात त्याच्या जामिनासाठी अर्ज करणार आहेत.
आर्यन खानला २ ऑक्टोबर रोजी एनसीबीने त्याचा मित्र अरबाज खानसह मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ जहाजावर पकडले. एनसीबीला आर्यनकडून ड्रग्ज मिळाले नसल्याचे सांगण्यात आले आहे. आर्यनने चौकशीदरम्यान ड्रग्स हौशी म्हणून ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली होती. त्याचा मित्र अरबाज मर्चंटने त्याच्या बुटामध्ये चरस लपवला होता. आर्यनविरोधातील खटल्याविरोधात अनेक बॉलिवूड स्टार्सनी शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाला पाठिंबा दिला आहे. सेलेब्स देखील गौरी-शाहरुखला भेटण्यासाठी मन्नतला जाताना दिसले आहेत.