राजकारण

कुत्रा इमानी असतो, तो चोर आणि भामट्यांवर भुंकतो; भातखळकरांचे महापौरांना जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : पश्चिम उपनगरातील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात एक चार मजली इमारत बुधवारी रात्री कोसळून झालेल्या दुर्घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले असून त्यांना बीडीबीए रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यावेळी ही दुर्घटना घडली, त्यावेळी काही मुलांसह अनेक लोक या इमारतीमध्ये होते. इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेवरुन भाजपाने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्याबाबत पत्रकारांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना प्रश्न विचारला होता. त्यावर ‘भाजपला भौ-भौ करत राहू दे. ते अगदी दूध के धुले आहेत’ असं म्हणत टीकास्त्र सोडलं. पेडणेकर यांच्या टीकेला आता भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर पलटवार केला आहे. ‘कुत्रा इमानी असतो, तो चोर आणि भामट्यांवर भुंकतो’ अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. ‘महापौर किशोरी पेडणेकर यांचे हे वक्तव्य त्यांचे संस्कार आणि पक्षाची संस्कृती दाखवणारे आहे. महत्त्वाचे म्हणजे कुत्रा इमानी असतो, तो चोर आणि भामट्यांवर भुंकतो हे लक्षात असू दे’ असं भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button