राजकारण

वानखेडे प्रकरणात तक्रार दाखल झाल्यावर कारवाई; वळसे-पाटील

मुंबई : मुंबई ड्रग्स प्रकरणाला रोज नवं वळण मिळत आहे. आता प्रभाकर साईल यांच्या एका व्हिडीओमुळे समीर वानखेडे अडचणीत आले आहेत. या प्रकरणात २५ कोटीची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यानंतर अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत अधिक आक्रमक झाले आहेत. तर साईल यांनी केलेल्या मागणीनुसार मुंबई पोलिसांकडून त्यांना संरक्षण देण्यात आलं आहे. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर कारवाई करु, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

समीर वानखेडे प्रकरणावर आपली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत जुजबी चर्चा झाल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं. याबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका ते स्वत:च स्पष्ट करतील असंही वळसे-पाटील म्हणाले. तर प्रभाकर साईलचं प्रतिज्ञापत्र मी पाहिलं आहे. त्यांना जी स्वत:च्या जीवाची भीती वाटते त्यासाठी त्यांनी संरक्षण मागितलं होतं. त्यांना पोलीस सुरक्षा पुरवण्यात आली आहे, अशी माहिती वळसे-पाटलांनी दिली.

दरम्यान, या प्रकरणात आपण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची भेट घेऊन कारवाईची मागणी करणार असल्याचं अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं होतं. त्याबाबत विचारलं असता. नवाब मलिक यांची आणि माझी भेट झालेली नाही. त्यांची भेट झाल्यानंतर त्यांचं म्हणणं समजून घेऊन पुढील कारवाई करु, असं गृहमंत्री म्हणाले. तसंच कारवाई करण्यासाठी कुणीतरी तक्रार दाखल करायला हवी. तशी तक्रार दाखल झाल्यानंतर आम्ही कारवाई करु, असंही वळसे-पाटलांनी स्पष्ट केलंय. त्याचबरोबर आजपर्यंत केंद्रीय यंत्रणांचा असा वापर कधीही झाला नव्हता. आता जास्त वापर होतोय. सरकार आणि राजकीय व्यक्तींना वेठीला धरलं जात आहे, अशी टीकाही त्यांनी केंद्र सरकारवर केलीय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button