Top Newsराजकारण

सोमय्यांचा सत्कार भाजप कार्यकर्त्यांना भोवला; पोलिसांची ३०० जणांवर धडक कारवाई

पुणे : पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांना माजी खा. किरीट सोमय्यांचा सत्कार करणं चांगलच भोवलं आहे. सोमय्या यांचा पुणे महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. बेकायदेशीर सभा घेतल्यामुळे पुणे पोलिसांनी धडक करावाई केली आहे. भाजपच्या एकूण ३०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर सोमय्यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की करण्यात आली होती. यामुळे पायऱ्यांवरच किरीट सोमय्यांचा सत्कार करण्याचे भाजप कार्यकर्त्यांनी ठरवलं होते. सोमय्या पुणे दौऱ्यावर होते यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. कोविड सेंटरच्या घोटाळ्यासंदर्भात किरीट सोमय्या तक्रार करण्यासाठी महापालिका आणि पोलिस स्थानकात जात होते. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला होता. सोमय्यांचा ताफा अडवताना दगडफेक झाली होती. तर सोमय्या पुणे महानगरपालिकेत जात होते. त्यावेळी पायऱ्यांवर त्यांच्यासोबत धक्काबुक्की झाली. या धक्काबुक्कीत सोमय्या पायऱ्यांवर कोसळले होते. याच पायऱ्यांवर भाजप कार्यकर्त्यांनी सोमय्यांचा सत्कार केला आहे.

भाजप कार्यकर्त्यांना सोमय्यांचा पुणे महानगरपालिकेच्या पायऱ्यावंर सत्कार करण्याची परवानगी दिली नव्हती. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु पोलिसांच्या आवाहनाला केराटी टोपली दाखवत कार्यकर्त्यांनी मोठ्या गर्दीने सोमय्यांचा सत्कार झाला. पोलिसांनी या भाजपच्या कार्यकर्त्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. पुणे शहर पोलिसांनी किरीट सोमय्या यांचा पुणे महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर सत्कार करताना बेकायदेशीर सभा घेतल्यामुळे भाजपचे शहर युनिट प्रमुख जगदीश मुळीक यांच्यासह ३०० पेक्षा अधिक भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

काँग्रेसकडून पायऱ्यांचे शुद्धीकरण

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा सत्कार करण्यास पालिका प्रशासनाने नकार दिला होता. परंतु तरिही मोठ्या संख्येने सोमय्यांचा सत्कार भाजप कार्यकर्त्यांनी केला. सोमय्यांच्या सत्कारानंतर काँग्रेस नेत्यांनी पुणे मनपाच्या पायऱ्यांवर गोमूत्र टाकून शुद्धीकरण केले. सर्व पायऱ्या काँग्रेसकडून स्वच्छ करण्यात आल्या. भाजपच्या कामाचे निषेध म्हणून पायऱ्यांचे शुद्धीकरण करण्यात आले असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button