अर्थ-उद्योग

९युनिकॉर्न्सद्वारे नवीन जागतिक मापदंड स्थापित

मुंबई : ९युनिकॉर्न्स हा भारतातील आघाडीचा अ‍ॅक्सलेटर फंड, भारतातील लवकरच्या टप्प्यातील गुंतवणुकीसाठी काही नवीन मापदंड स्थापण्याचे नियोजन करत आहे. अनेक अब्जाधीश व एलपींचे पाठबळ असलेल्या १०० दशलक्ष डॉलर्सच्या या फंडाने २०२१ या वर्षात ३० हून अधिक अप-राउंड्स घेतले आणि आपल्या पोर्टफोलिओतील अनेक जागतिक व्हीसी, कौटुंबिक कार्यालये, युनिकॉर्न संस्थापक व आघाडीच्या सीएक्सओंद्वारे १० वेळा सहगुंतवणूक (को-इन्व्हेस्टिंग) केली. हा मुंबईस्थित अ‍ॅक्सलेटर फंड येत्या काही वर्षांत आपल्या साठ्यातून अब्जावधी डॉलर्सच्या स्टार्टअप्स निर्माण करण्याच्या मार्गावर आहे. फंडाने निधीपुरवठ्याचे एक नवीन व अनन्यसाधारण धोरण विकसित केले असून, याद्वारे फंड, कल्पनेच्या टप्प्यावरील तसेच सीरिज सी टप्प्यावरील, अशा दोन्ही प्रकारच्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करणार आहे. कल्पनेच्या टप्प्यातील (आयडिया-स्टेज) स्टार्टअप्समध्ये ०.५ दशलक्ष ते १ दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक करण्याची फंडाची योजना आहे.

सीरिज सी व त्यावरील, उच्चवाढीच्या टप्प्यातील स्टार्टअप्सना ३ दशलक्ष डॉलर्सपर्यंत निधी पुरवण्याची फंडाची योजना आहे. २०२१ मध्ये, या दोन वर्षे जुन्या फंडाने आधीच आपल्या भांडवलाच्या २५ टक्के निधी उच्चवाढीची क्षमता असलेल्या सीरिज सी व बी स्टार्टअप्समध्ये गुंतवला आहे आणि त्याचवेळी कल्पनेच्या स्तरावर उत्कृष्ट भासणाऱ्या कंपन्यांना संभाव्य युनिकॉर्न्स म्हणून विकसित करण्याचे कामही फंडाने सुरू ठेवले आहे.

९युनिकॉर्न्स फंडाने अनेक नवोन्मेषकारी व चाकोरीबाह्य स्टार्टअप्सच्या अप राउंड्समध्ये आघाडीची गुंतवणूक केली आहे. एकंदर फंडाने आपल्या पोर्टफोलिओतील ३० कंपन्यांना अप राउंड्समध्ये सहाय्य केले आहे. डॉ. अपूर्व रंजन शर्मा, अनिल जैन, अनुज गोलेचा आणि गौरव जैन (व्हेंचर कॅटालिस्टचे सर्व सह-संस्थापक) यांनी, २०२१ मध्ये, स्थापन केलेल्या या फंडाने १२ सीरिज सी स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. यांमध्ये वेदांतु, मेरोला, शिपरॉकेट, फ्लोबिझ, रेशामंडी, बिडॅनो, ब्ल्यूस्मार्ट, लिडो, IGP.com, फार्म्स आणि गोक्यूआयआय या कंपन्यांचा समावेश होतो.

डॉ. अपूर्व रंजन शर्मा म्हणाले, ९युनिकॉर्न्स हा एक सेक्टर अग्नोस्टिक आणि स्टेज अग्नोस्टिक फंड आहे. एकीकडे आम्ही कल्पना व बीज टप्प्यावरील स्टार्टअप्सवर अत्यंत टोकदारपणे लक्ष केंद्रित करून जगातील सर्वांत मोठा अ‍ॅक्सलेटर फंड होण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे पण त्याचवेळी आम्ही स्टार्टअप्सना आयपीओमार्फत उपलब्ध असलेल्या बाहेर पडण्याच्या संधी विचारात घेऊन सीरिज बी आणि सी टप्प्यातील स्टार्टअप्समध्येही गुंतवणूक करत आहोत. भारतातील टेक स्टार्टअप्सनी अलीकडील काळात आयपीओचा पर्याय निवडला आहे. संपूर्ण व्हीसी उद्योगात आम्ही आत्तापर्यंत नवीन मापदंड स्थापन करत आलो आहोत आणि आमचे अप राउंड्समधील आकडे अद्याप कोणीही गाठू शकलेले नाही. पुढील वर्षी आम्ही आणखी आक्रमक भूमिका घेणार आहोत आणि जगभरातील एकूण १५० स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करणार आहोत. या गुंतवणुकीचे मूल्य सुमारे ४०० कोटी रुपये किंवा त्याहून अधिक असेल.

भारतात सुरुवातीच्या टप्प्यावरील गुंतवणुकांनी जोर धरल्यामुळे, २०२१ मध्ये, फंडाने डील्सच्या संख्येत ३ पटींनी वाढ साध्य करून ही संख्या १०१वर नेली. २०२० मध्ये फंडाने ३२ डील्समध्ये गुंतवणूक केली. हे फंडाचे पहिलेच वर्ष होते. या वर्षात ९युनिकॉर्न्स फंडाने तब्बल ९० अनन्यसाधारण स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली. गुंतवणूक फेरीचे एकूण आकारमान ४६५ दशलक्ष डॉलर्स होते. स्टॅण्डअलोन तत्त्वावर, ९युनिकॉर्न्स ने एकूण ३२ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button