हिंदवेअर अप्लायन्सेसची आयओटी सक्षम एअर कूलर्सची वैविध्यपूर्ण श्रेणी
भारताचा पहिला फोल्डेबल एअर कूलर सादर

नवी दिल्ली : ‘हिंदवेअर अप्लायन्सेस’चे निर्माते सोमाणी होम इनोव्हेशन लिमिटेडने (एसएचआयएल) आज भारताचा पहिला फोल्डेबल एअर कूलर ‘आय-फोल्ड’ सादर करत आयओटी-सक्षम एअर कूलर्सची भावी श्रेणी सादर केली. नवीन श्रेणी ग्राहकांच्या स्मार्ट होम्स निर्मितीसंदर्भात असलेल्या वाढत्या गरजांची पूर्तता करते आणि त्यांना असलेल्या ऑफ-सीझन स्टोरेज समस्यांचे निराकरण करते. एअर कूलर्सची श्रेणी अॅमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट, हिंदवेअरचे स्वत:चे पोर्टल www.evok.in आणि निवडक रिटेल स्टोअर्स अशा आघाडीच्या ई-कॉमर्स पोर्टल्सवर उपलब्ध आहे.
आय-फोल्ड हा भारताचा पहिला एअर कूलर* ५ मिनिटांपेक्षा कमी वेळेमध्ये सहजपणे फोल्ड करत लहान जागेमध्ये स्टोअर करता येऊ शकतो. ज्यामुळे भारतीयांना घरामध्ये स्टोरेजसंदर्भात सामना कराव्या लागणा-या समस्यांचे निराकरण होते. आय-फोल्ड सुसंगत असण्यासोबत त्यामध्ये शक्तिशाली मोटर देखील आहे, जी जलद कूलिंग देते. या कूलरमध्ये ‘कम्प्लीटली शट लोवर्स’ व ‘इन्सेक्ट अॅण्ड डस्ट फिल्टर्स’ सारखी सोयीस्कर वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे कूलर व ब्रीडिंगच्या आतील भागामध्ये डास व कीटकांचा प्रवेश होत नाही. हे एअर-कूलर फॅशनेबल शहरी घरांसाठी डिझाइन करण्यात आले आहे. या एअर-कूलरमध्ये दर्जात्मक तंत्रज्ञान असण्यासोबत घरातील सजावटींमध्ये सहजगत्या सामावून जाणा-या आकर्षक रंगसंगतीने युक्त डिझाइनचे कलाकृती संयोजन आहे. हिंदवेअर स्नोक्रेस्ट आय-फोल्डची किंमत १९,९९० रूपये आहे.
कंपनीने दोन आयओटी सक्षम एअर कूलर्स देखील सादर केले आहेत, ते म्हणजे वैयक्तिक एअर कूलर स्पेक्ट्रा आय-प्रो ३६एल आणि डिसर्ट एअर कूलर अकुरा आय-प्रो ७०एल. दोन्ही कूलर्समध्ये अॅमेझॉन अॅलेक्सा आहे. या दोन्ही स्मार्ट उपकरणांवर हिंदवेअर अप्लायन्सेस अॅपच्या माध्यमातून कधीही, कुठूनही नियंत्रण ठेवता येऊ शकते. हे अॅप ग्राहकांना उपकरणे चालवण्यात, त्यावर देखरेख ठेवण्यात आणि दूरून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात मदत करते. त्याचप्रमाणे स्वत:हून समस्येचे निदान करणे, संकट दूर करणे (ट्रबलशूट) आणि सर्व्हिसिंगची विनंती नोंदवणे यांसारखी कामे एका बटनाच्या क्लिकमध्ये करता येतात. हे अॅप ग्राहकांना कूलर्स ऑन व ऑफ करणे, कूलिंग मोड्स सेट करणे, पंख्याची गती व स्विंगवर नियंत्रण ठेवणे आणि टाइमर्स सेट करणे अशा सर्वोत्तम सुविधा देते. एअर कूलर्समध्ये गेस्चर-कंट्रोल वैशिष्ट्ये आहेत, जी ग्राहकांना संवेदनेसह हालचाल करण्याची सुविधा देतात. व्यक्तीच्या हाताचा वापर करत एअर कूलर ऑन करता येतो (हात डावीकडून उजवीकडे सरकवत) आणि पंख्याची गती कमी-मध्यम-उच्च अशी नियंत्रित करता येते. नवीन एअर कूलर्समध्ये जिओ-फेन्स तंत्रज्ञान हे सर्वोत्तम लोकेशन सेन्सिंग कार्यक्षम वैशिष्ट्य देखील आहे, जे ग्राहकाच्या सान्निध्यानुसार एअर कूलर कार्यसंचालन कार्यान्वित करते. हिंदवेअर स्पेक्ट्रा आय-प्रो ३६एल एअर कूलरची किंमत १५,९९० रूपये आहे, तर हिंदवेअर अकुरा आय-प्रो ७०एल एअर कूलरची किंमत १७,४९० रूपये आहे.
या सादरीकरणाबाबत बोलताना सोमानी होम इनोव्हेशन लिमिटेडचे (एसएचआयएल) मुख्य कार्यकारी अधिकारी व पूर्णवेळ संचालक श्री. राकेश कौल म्हणाले, ”एचएसआयएलमध्ये आम्ही नेहमीच ग्राहकांना क्षमता देण्याला प्राधान्य देत आलो आहोत. नाविन्यपूर्ण उत्पादने व तंत्रज्ञानांसह आमचा देशभरात आनंददायी ‘ग्राहक अनुभव’ देण्याचा मनसुबा आहे. घराघरांमध्ये आयओटी-आधारित उत्पादनांच्या वापरामध्ये व्यापक वाढ होण्यासोबत भारत कनेक्टेड होम अप्लायन्सेससाठी प्रमुख बाजारपेठ म्हणून उदयास आला आहे. ही वाढती गरज लक्षात घेत आम्हाला आयओटी एअर कूलर्सची श्रेणी आणि ग्राहकांचे जीवन सुलभ करण्यासाठी धोरणात्मकरित्या डिझाइन करण्यात आलेले आमचे उल्लेखनीय उत्पादन हिंदवेअर स्नोक्रेस्ट आय-फोल्ड हा भारताचा पहिला फोल्डेबल एअर कूलर सादर करण्याचा आनंद होत आहे. उत्पादनाच्या नवीन श्रेणीमधून ग्राहक अनुभवाप्रती नेहमीच नाविन्यतेला प्राधान्य देणारे आमचे तत्त्व दिसून येते.”
सुरेखरित्या एकीकृत केलेली आय-प्रो ग्राहकोपयोगी उत्पादनांची भावी श्रेणी झपाट्याने उदयास येणा-या आयओटी विभागामधील हिंदवेअर अप्लायन्सेसच्या यशाला दाखवते. ही श्रेणी त्यांची आयओटी इको सिस्टिम – हिंदवेअर कनेक्टच्या माध्यमातून स्मार्ट घरे उभारण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. स्मार्ट होम ऑटोमेशनचे विकसित वापरकर्ते आणि नव्याने या शैलीशी जुळवून बघणारे ग्राहक यांच्यासाठी ही अव्वल दर्जाची उत्पादने विकसित करण्यात आली आहेत. सर्व उत्पादने स्मार्ट ऑटोमेशनच्या माध्यमातून आयुष्य सुलभ करण्याच्या हेतूने डिझाइन करण्यात आली आहेत. तसेच या उत्पादनांमध्ये जिओ-फेन्सिंग, वाय-फाय डारेक्ट आणि अॅलेक्सा-नियंत्रित वैशिष्ट्यांसाठी अद्वितीय वैशिष्ट्ये आहेत.
हिंदवेअर अप्लायन्सेस ही देशातील सर्वाधिक वेगाने वाढणा-या ग्राहकोपयोगी उत्पादन कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी आजच्या आधुनिक ग्राहक जीवनशैलीला अनुसरून उत्पादने देते. भारतात अधिक चांगली घरे वास्तवात आणण्यासाठी यातील प्रत्येक उत्पादन योगदान देत आहे. सध्या सोमानी होम इनोव्हेशन लिमिटेडचे (एसएचआयएल) १०,३२३ हून अधिक रिटेल आउटलेट्स, १,०६२ हून अधिक वितरक भागीदार आणि भारतभरातील ७०९ हून अधिक आधुनिक रिटेल स्टोअर्सचे नेटवर्क आहे. कंपनीकडे वॉटर प्युरिफायर्स, वॉटर हिटर्स, एअर प्युरिफायर्स, चिमनी व एअर-कूलर्समधील आयओटी सक्षम उपकरणांची व्यापक श्रेणी आहे.