आता स्मार्टफोनची पॉवर बँक भाड्याने मिळणार
‘स्पाइक’ची सेवा; मुंबई, पुण्यासह देशभरातील ११ शहरांत सुरुवात
मुंबई : देशातील डिजिटायझेशनला अधिक वेग देत, जस्टडायलचे सह संस्थापक रमणी अय्यर यांनी ‘स्पाइक’ नावाची स्मार्टफोन पॉवर बँक भाड्याने (रेंटल) देण्याची सेवा नव्याने सुरु केली आहे. अय्यर हे दूरद्रष्टे असून त्यांनी जस्टडायलसह अनेक भविष्यातील उद्योगांची सह स्थापना केली आहे. आता जगभरातील सर्वात मोठी स्मार्टफोन पॉवर बँक भाड्याने देणारी कंपनी होण्याचे उद्दिष्ट साकारण्याचे त्यांनी ठरवले आहे. फक्त ६ महिन्यातच स्पाइकने भारतातील विस्तृत स्मार्टफोन पॉवर बँक भाड्याने देण्याचे नेटवर्क उभारले आहे. सध्या भारतभरात ते ११ शहरांमधील ८००० ठिकाणी लाइव्ह उपलब्ध आहे.
सध्याच्या घडीला, स्पाइक बंगळुरू, मुंबई, दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, चेन्नई, कोलकत्ता, कोईम्बतूर, चंदिगड, लखनौ, जयपूर आणि पुण्यात ही सेवा सुरु आहे. कंपनी सध्या वेगाने विकास करत असून लवकरच आणखी अनेक शहरात विस्तार करण्याच्या तयारीत आहे. या स्टेशनची उभारणी, ज्या ठिकाणी खूप गर्दी असते, तेथे होते. उदा. मेट्रो स्टेशन्स, सिनेमा, कॅफे, मॉल, एअरपोर्ट्स, रेल्वे स्टेशन्स, कॉर्पोरेट ऑफिसेस, टेक पार्क्स, हॉटेल्स, युनिव्हर्सिटीज आणि रुग्णालये इत्यादी. लोकांना अगदी सहजपणे स्पाइक पार्टनर आउटलेटवर जाऊन क्यूआर कोड स्कॅन करून पॉवर बँक भाड्याने घेता येते. कंपनीच्या पॉवर बँक वापरण्यास सोप्या असून त्यासोबत मायक्रो-यूएसबी, टाईप सी आणि अॅपल प्रमाणित लाइटनिंग केबल्स येतात. एकदा वापरल्यानंतर ही पॉवर बँक जवळच्याच स्पाइक स्टेशनवर परत करता येते.
अय्यर हे एक ध्येयवादी उद्योजक असून त्यांनी जस्टडायल तयार करण्यास मदत केली तीचे मूल्य १.८ अब्ज डॉलर्स इतके आहे. आता जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन पॉवर बँक भाड्याने देणारी इंडस्ट्री या स्पाइकच्या दृष्टीकोनावर ते भर देत आहेत. हे वेगाने विकास पावणारे क्षेत्र असून पुढील काही वर्षात त्याचे मूल्य १५ अब्ज डॉलर्स होण्याची अपेक्षा आहे. बाजारपेठेत सिंहाचा वाटा उचलण्याचे स्पाइकचे उद्दिष्ट आहे. हे करताना ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘स्टार्टअप इंडिया’ यासह अनेक भारतीय आकांक्षांना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट यामागे आहे.
रमणी अय्यर म्हणाले, “भारतातील संधी आणि ट्रेंड्स याबद्दल मी आशावादी आहे. या उद्योगात तीन मोठे ट्रेंड भरपूर पाठबळ देत आहेत. यात डिजिटल/ तंत्रज्ञान सोल्युशन स्वीकारण्यसाठी भारतातील खूप खुले वातावरण, भारतीय तरुणांद्वारे मोठ्या प्रमाणावर स्वीकारली जाणारी ‘शेअरिंग इकॉनॉमी’, स्मार्टफोनचा वेगाने वाढणारा ग्राहक वर्ग यांचा समावेश आहे. आता मागील वर्षात फोनचा वापर दुपटीने वाढला असल्याने स्मार्टफोनच्या बॅटरीवरील दबाव अभूतपूर्व वेगाने वाढला आहे. इथेच स्पाइकची निर्मिती झाली. स्पाइक वापरल्याने कुणाचीही बॅटरी संपणार नाही. म्हणूनच, फक्त मागील ६ महिन्यात आम्ही भारतातील ११ शहरांमध्ये वेगाने विस्तार केला. भारतातील सर्वात मोठा पॉवर बँक रेंटल बिझनेस होण्यासाठी आमचे ३५०० भागीदार आणि ८००० पेक्षा जास्त चार्जिंग स्टेशन कार्यरत आहेत”.