भीमा-कोरेगाव हिंसा प्रकरण : वरवरा राव यांना जामीन मंजूर
मुंबई : शहरी नक्षलवाद आरोपाप्रकरणी अटकेत असलेले ८२ वर्षांचे लेखक-कवी वरवरा राव यांच्या अंतरिम जामिनाच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचा सोमवारी निर्णय झाला. यावेळी वरवरा राव यांच्या जामीनावर सुटका झाली. तर वरवरा राव यांचा जामीन मंजूर करण्यात आले आहे. लेखक-कवी वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. वैद्यकीय कारणास्तव राव यांची तातडीच्या अंतरिम जामिनावर सुटका करावी या मागणीसाठी राव यांच्यासह त्यांच्या पत्नी हेमलता यांनी स्वतंत्र याचिका केली होती.
प्रदिर्घ काळ सुरू असलेल्या वरवरा राव यांच्या सुनावणीनंतर उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर कऱण्यात आला. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठाने याचिकेवरील निर्णय जाहीर केला नव्हता. तसेच निर्णय होईपर्यंत राव यांना नानावटी रुग्णालयातच ठेवण्याचे आदेश स्पष्ट केले होते. तर यासंदर्भात उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले की, राव यांचे वय, आरोग्य आणि कैद्याचा वैद्यकीय सुविधा मिळण्याचा मूलभूत अधिकार लक्षात घेता आम्ही त्यांना वैद्यकीय जामीन मंजूर करत आहोत.
राव यांनी गेल्या ३६५ दिवसांपैकी १४९ दिवस विविध रुग्णालयात होते. त्यातूनच त्यांची वैद्यकीय स्थिती लक्षात येते, असा युक्तिवाद राव यांच्या कुटुंबियांतर्फे सुनावणीच्या वेळी करण्यात आला होता. यासह राव यांची प्रकृती ही कारागृहात नाही, तर कुटुंबात राहून सुधारेल, असा दावा करत तळोजा कारागृहाऐवजी हैदराबाद येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी राव यांच्या कु टुंबियांतर्फे करण्यात आली. तर राव यांची वैद्यकीय स्थिती माहीत असूनही त्यांना अटकेत ठेवणे म्हणजे त्यांच्या जगण्याच्या आणि चांगल्या आरोग्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे, असा दावाही करण्यात आला.