शिक्षण

दहावीचे विद्यार्थी बिनापरीक्षा पास करण्याचा निर्णय जवळपास निश्चित !

मुंबई : राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, असे संकेत आता दिसत आहेत. यामागे कोरोनाचा संसर्ग हेच कारण आहे. राज्यातील विविध भागांमध्ये शाळा सुरु केल्यानंतर शेकडो विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्य सरकार आता खबरदारी म्हणून दहावी-बारावीची लेखी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे तामिळनाडू राज्यात दहावीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अगदी त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही तसा निर्णय घेतला जाऊ शकतो. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि मदत व पूनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.

“आम्ही दोन दिवसांपासून राज्यातील प्रत्येक भागाचा आढावा घेतला. प्रत्येक जिल्हाधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. पण सोलापूर, वाशिम किंवा इतर ठिकाणी असेल, आम्ही शिक्षक, विद्यार्थ्यांची सुरक्षितता ठेवणं याला प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घ्यावे, असं आम्ही सांगितलं आहे”, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

“गेल्यावर्षी कोरोनामुळे आठवीपर्यंत तसेच नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आपल्याला घेता आली नव्हती. त्यांचं वर्षभरातील जो परफॉर्मन्स होता तो काऊंट करुन त्यांना पुढच्या इयत्तेसाठी उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला होता. तसंच भविष्यातही आपण करु शकतो”, असं त्यांनी सांगितलं.

“दहावी आणि बरावी बोर्डाच्या परीक्षा महत्त्वाच्या आहेत. कारण ते महत्त्वाचं वर्ष आहे. पुढच्यावर्षी विद्यार्थ्यांना अॅडमिशन वगैरे घ्यावे लागतील. त्यामुळे येणाऱ्या काळात याबाबत विचार करु आणि तुम्हाला त्याबाबतच लवकरच निर्णय सांगू”, अशीदेखील माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सरकार काही महत्त्वाचे पाऊलं उचणार असल्याचे संकेत राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. राज्यात पुन्हा लॉकडाऊन करणं हे आर्थिक दृष्टीकोनाने राज्याला परवडणारं नाही. त्यामुळे सरकार पर्यायी मार्ग काढण्यावर भर देत असल्यांचं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. राज्यात पुढच्या दोन महिन्यांमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा येऊ घातल्या आहेत. या परीक्षा म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट आहे. मात्र, सध्या या परीक्षांवर कोरोनाचं सावट आहे. या परीक्षांवर योग्य पर्यायी मार्ग काढणार असल्याचं वडेट्टीवार यांनी ‘सांगितलं
.
“महाराष्ट्र सरकार वाढती आकडेवारीची स्थिती गांभीर्यानं घेतली आहे. राज्याला आणि एकूण अर्थकारणाला लॉकडाऊन परवडणारे नाही. मात्र लॉकडाऊन टाळण्यासाठी लोकलच्या फेऱ्या कमी करणे, एसटी बसेसमधील गर्दी कमी करणे आदी शक्यतांची पडताळणी केली जात आहे. सिनेमागृहे- मंगल कार्यालयात होणाऱ्या गर्दीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मत्हत्वाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना सरसकट पास करणे आणि ऑनलाईन परीक्षा घेणे याबाबतही चाचपणी सुरू आहे”, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं. त्याचबरोबर येत्या काळात हे निर्णय अपेक्षित असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button