Top Newsशिक्षण

बारावी परीक्षेचा ५ आणि ७ मार्चचा पेपर लांबणीवर

मुंबई : बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ५ आणि ७ मार्चच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. भाषा विषयांचे पेपर पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. ४ मार्चला परीक्षा सुरु होणार होती. ५ मार्चचे पेपर आता ५ एप्रिलला होणार आहेत. तर, ७ मार्चचे पेपर आता ७ एप्रिलला होणार आहेत.

विद्यार्थी आणि पालकांच्या मनात परीक्षा का पुढे ढकलण्यात आला यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो. बोर्डाच्या वाहनाला संगमनेर येथे आग लागली होती. त्या आगीत पेपर जळून नष्ट झाल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांनी या बदलांची नोंद घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. ५ मार्चला सकाळी हिंदी तर दुपारच्या सत्रात जर्मन जपानी चिनी आणि पर्शियन विषयाचे पेपर होणार होते. तर, ७ मार्चला सकाळच्या सत्रात मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी,(अरेबिक, देवनागरी), मल्याळम, तामिळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली, आणि दुपारच्या सत्रात उर्दू, फ्रेंच, अर्धमागधी, स्पॅनिश आणि पाली विषयाचा पेपर होणार होता.

५ मार्चला सकाळी हिंदी तर दुपारच्या सत्रात जर्मन जपानी चिनी आणि पर्शियन विषयाचे पेपर होणार होते. हे पेपर आता ५ एप्रिलला होतील. तर, ७ मार्चला सकाळच्या सत्रात मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी,(अरेबिक, देवनागरी), मल्याळम, तामिळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली, आणि दुपारच्या सत्रात उर्दू, फ्रेंच, अर्धमागधी, स्पॅनिश आणि पाली विषयाचा पेपर होणार होता. ते आता ७ एप्रिल रोजी होतील.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून बारावीच्या परीक्षा ४ मार्च ते ३० मार्च या कालावधीत घेण्यात येतील. प्रात्याक्षिक परीक्षा, श्रेणी परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च मध्ये होतील. कोरोना आणि इतर कारणामुळं अडचण आल्यास ३१ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा होतील.

दहावीची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत घेण्यात येणार आहेत. प्रात्याक्षिक, तोडी परीक्षा २५ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत परीक्षा होईल. काही कारणामुळं प्रात्याक्षिक परीक्षा देता आली नाही तर ५ एप्रिल ते २२ एप्रिलपर्यंत होतील. मंडळाच्या परीक्षा ठरलेल्या काळातच होतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button