राजकारण

गणेश नाईक यांची एसआयटी चौकशी करा : सुप्रिया सुळे

नवी मुंबई : भाजपा आमदार गणेश नाईक यांनी भरसभेत इंटरनॅशनल डॉनबद्दल वक्तव्य केलं होतं. सर्व इंटरनॅशनल डॉन मला ओळखतात, गणेश नाईक यांच्या या वक्तव्यानंतर वातावरण तापलं आहे. इंटरनॅशनल डॉनबरोबर संबंध असल्याचे जाहीर वक्तव्य करणारे भाजपा आमदार गणेश नाईक यांची एसआटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वी तुर्भेमधली भाजपच्या कार्यक्रमात गणेश नाईक बोलत होते. नवी मुंबई महापालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसं फोडाफोडीचं राजकारण रंगलं आहे. निवडणुकीच्या आधीच शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजपचे काही नगरसेवक फोडले आहेत. या फोडाफोडीवर भाष्य करताना गणेश नाईक यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. “कोणत्याही गुंडगिरीला घाबरु नका. रात्री अपरात्री मला कधीही फोन करा. इथलेच काय इंटरनॅशनल डॉन सुद्धा मला ओळखतात. त्यामुळे घाबरायची गरज नाही, असं गणेश नाईक यांनी जाहीर भाषणात सांगितलं होतं.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “इंटरनॅशनल डॉनसोबत संबंध अससल्याचं जाहीर वक्तव्य करणाऱ्या गणेश नाईक यांची एसआटी चौकशी करावी. हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असून याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लक्ष घालावे.” यासाठी अमित शाह यांच्यासोबत लेखी पत्रव्यवहार करणार असून संसदेत याबाबत प्रश्न उपस्थित करणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान अजित पवार यांना महाराष्ट्र सहकारी बॅंक घोटाळ्यातून क्लिन चीट मिळाल्याने भाजपा परत एकदा तोंडावर पडली असल्याचा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. तर पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी पोलीस योग्य तो तपास करतील, महाराष्ट्र पोलिसांवर आपला विश्वास असल्याचे सुळे यांनी स्पष्ट केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button