Top Newsराजकारण

राज्यात अजित पवारांचे नव्हे, तर उद्धव ठाकरेंचे सरकार : नाना पटोले

रत्नागिरी: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोप वाढत चालले असताना, दुसरीकडे महाविकास आघाडीतील बेबनाव चव्हाट्यावर आला आहे. १० मार्चनंतर राज्यात मोठे बदल दिसतील, असे विधान नाना पटोले यांनी केले होते. यानंतर राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर आता नाना पटोले यांनी केलेल्या एका विधानामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीत वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना राज्याचा अर्थमंत्री राष्ट्रवादीचा असल्याने तुमच्यावर अन्याय होतोय का, असा प्रश्न नाना पटोले यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना, राज्याचे सरकार हे अजित पवार यांचे नसून उद्धव ठाकरे यांचे आहे. ते राज्याचे प्रमुख आहेत, त्यामुळे आमच्या ज्या मागण्या असतील त्या त्यांच्यासमोर मांडणे आमचे काम आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. रत्नागिरी येथे आयोजित ओबीसींच्या हल्लाबोल आंदोलनानंतर ते बोलत होते.

राऊत यांनी केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी

भुंकणाऱ्या कुत्र्यांच्या तोंडी आपण लागत नाही, याचा अर्थ मी कुणाला कुत्रा म्हटले असे होत नाही. किरीट सोमय्या यांनी कोर्ले गावात जाऊन पाहणी केली. त्यात यांना मुख्यमंत्र्यांची घर दिसली का, असा खोचक सवालही त्यांनी केला. तसेच संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

दरम्यान, जरी एका पक्षाचे सरकार असले तरी अनेक प्रश्न निर्माण होतात आणि मुख्यमंत्र्यांना ते सोडवावे लागतात. राज्यात तर तीन पक्षांचे सरकार असताना काही प्रश्न नक्कीच आहेत. ते आम्ही आग्रहाने मांडून सोडवून घेणार आहोत. प्रश्न आहेत, हे मात्र आम्ही मान्य करतो. निधीच्या बाबतीतही प्रामुख्याने प्रश्न असून ते सोडवले जातील, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले होते.

सासू बनून त्रास द्याल तर सुनेचेही दिवस येतील, मोदींना इशारा

ओबीसी समाजाच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक झाली असून आज काँग्रेसने हल्लाबोल रॅली काढलीय.रत्नागिरीतून या आंदोलनाला सुरुवात झालीय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार, माजी खासदार हुसेन दलवाई या रॅलीत सहभागी झाले होते. केंद्र सरकारच्या इंपिरीअल डाटा न दिल्यामुळे सुप्रीम कोर्टाने ओबीसी समाजाचा राजकीय आणि सामाजिक आरक्षण कमी केलं. सातत्याने राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून केंद्र सरकारला डाटा देण्याची मागणी केली. या सगळ्या व्यवस्थेमध्ये केंद्र सरकारच्या या धोरणामुळे ओबीसी समाजाचा राजकीय सामाजिक आणि उद्याच्या काळात आरक्षणच कमी करायचे धोरण केंद्र सरकारने सुरू केलेला आहे. असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय. गेल्या अनेक महिन्यापासून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात आहे. त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही.ओबीसी आरक्षणावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आरोपांच्या फैरी सुरू आहेत.

ओबीसी आरक्षण आणि तर मागण्यांसाटी जनजागरणाची सुरुवात काँग्रेसने रत्नागिरीतून केलीय. सरकारच्या खासगीकरण धोरणामुळे सगळ्यात मोठा आरक्षणाला धोका निर्माण झालेला आहे. केंद्र सरकारने सगळे सार्वजनिक उपक्रम विकायला सुरुवात केलीय.कोकण रेल्वेदेखील विकायला काढलीय. जर सार्वजनिक उपक्रम खाजगी झाले तर आरक्षण या माध्यमातून आरक्षण संपवण्याचा घाट नरेंद्र मोदींच्या सरकारने सुरू केला आहे. त्यांच्या विरोधात जनजागरण मेळाव्याची सुरुवात रत्नागिरीतून काँग्रेसने केलीय. अशी माहिती यावेळी काँग्रेसने दिली आहे. सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दाही तापला आहे. अलिकडेच मराठा आरक्षणासाछी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी उपोषणाची हाक दिल्याने सरकारची चिंता वाढली आहे.

मोदींवर टीका करताना, भाजपच्या भाषणातून काँग्रेसचे नाव गेले तर यांना कोणी विचारणार नाही. त्यामुळे भाजपच्या प्रत्येक भाषणात काँग्रेसवर हल्लाबोल केला जातोय. मोदी सरकारने ८ वर्षाच्या कामाचा हिशोब द्यावा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीये. नरेंद्र मोदी यांच्या पेक्षा मोठा भूकंप कुठला असूच शकत नाही, असा हल्लाबोल देखील नाना पटोले यांनी मोदींवर केला आहे. आपला देश चीन च्या ताब्यात चाललाय. सुनेचे दिवस येतील.सासू सारखा त्रास दिला तर त्रास होणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button