…तर रमजानवरही निर्बंध घालावेत : कंगना
![](https://dg24.in/wp-content/uploads/2021/03/Kangna.jpg)
नवी दिल्ली : देशभरातून भाविक कुंभमेळ्यासाठी दाखल झाले असून, कुंभमेळ्यातही कोरोनाचा शिरकाव झाला असून, येणाऱ्या काळात कुंभमेळ्यामुळे देशातील परिस्थिती बिघडू शकते, असा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी मोदींनी कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने करण्याची विनंती केली.
हरिद्वारमधील कुंभमेळ्यात कोरोनाचा शिरकाव झाला असून, अनेक साधू आणि भाविकांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कुंभमेळ्यात करोनाचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुना आखाडाचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याकडे कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने करण्याचे ट्विट करत आवाहन केले आहे.
या मुद्यावर आता आपल्या वादग्रस्त विधानाने नेहमी चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना राणावत हिने ट्विट केले आहे. कंगना राणावतने पंतप्रधान मोदींना आवाहन करत ट्विट केले होते की, माननीय पंतप्रधानजी, मी आपल्याला विनंती करते, की कुंभमेळ्यानंतर रमजानमध्ये होणाऱ्या मिलन समारंभांवरही निर्बंध घालण्यात यावेत.