राजकारण

हायकोर्टाने दणका देताच सचिन वाझेची याचिका मागे

मुंबई : चांदिवाल आयोगाच्या विरोधात मुंबई हायकोर्टात दाखल केलेली याचिका सचिन वाझेने आज बिनशर्त मागे घेतली आहे. या संदर्भात सचिन वाझे याच्या याचिकेमध्ये जोडण्यात आलेल्या चार प्रतिज्ञापत्रं जोडली होती. यात देण्यात आलेली माहिती चुकीची असून एका प्रकारे हायकोर्टाची फसवणूक आहे असे हायकोर्टाने म्हटल्यानंतर सुनावणी दरम्यान बिनशर्त याचिका वापस घ्या. अन्यथा कठोरपणे ती आम्ही फेटाळून लावू अशा शब्दात हायकोर्टाने सचिन वाझेला फटकारले होते. काल हायकोर्टाच्या फटकारानंतर आज सचिन वाझे याच्याकडून मुंबई हायकोर्टातून ही याचिका मागे घेण्यात आली आहे.

चांदीवाल आयोगाला दिलेले आपले चार अर्ज फेटाळल्याच्या निर्णयाविरोधात वाझेने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, सदर याचिकेत योग्य माहिती लपवत असल्याबद्दल खंडपीठानं वाझेच्या वकिलांना फटकारले. न्या. गौतम पटेल आणि माधव जामदार यांच्या खंडपीठाने सदर याचिकेमध्ये योग्य माहिती लपवल्याबद्दल ताशेरे ओढले आहेत.

एकंदरीत माहितीप्रमाणे चांदीवाल आयोगाने २४ जानेवारी व ९ फेब्रुवारी रोजी दिलेल्या आदेशांच्या वैधतेला वाझे याने हायकोर्टात आव्हान दिले होते. २१ जानेवारी रोजी वाझे याने मुंबई पोलिसांचे सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारांबे यांना आयोगापुढे साक्ष देण्यासाठी समन्स बजवावे.असा अर्ज आयोगासमोर केला होता. मिलिंद भारांबे यांनी एक पत्र लिहिले होते आणि २५ मार्च २०२१ रोजी त्यासंबंधी अहवाल तयार केला होता. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भारांबे यांच्या पत्रासह गुप्त पत्राची प्रत ३० मार्च २०२१ रोजी आयोगा समोर सादर केली.

सह पोलीस आयुक्त भारांबे यांचा अहवाल आपल्या हिताआड येत असल्याचे म्हणत वाझे याने भारांबे यांना आयोगापुढे साक्ष देण्याकरिता बोलाविण्याची विनंती आयोगाला लेखी अर्जाद्वारे केली होती . मात्र आयोगाने २४ जानेवारीला वाजेचा सदर अर्ज फेटाळला होता. तसेच ९ फेब्रुवारी रोजी वाझेने अनिल देशमुख यांच्या संदर्भात दिलेला जबाब मागे घेण्यासाठी अर्ज केला. वाझे याने सुरुवातील आयोगाला सांगितले की देशमुख किंवा त्यांच्यावतीने अन्य कोणीही त्याला मुंबईतील बार मालकांकडून १०० कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले नव्हते. परंतू एका महिन्यातच त्याने तो जबाब मागे घेण्यास अर्ज केला. आयोगाने त्यावरही नकार दिला. त्यामुळे वाझे याने चांदीवाल आयोगाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र ती याचिका सचिन वाजे तर्फे बिनशर्त मागे घेण्यात आली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button