Top Newsराजकारण

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षपद भारतीय पंतप्रधान प्रथमच भूषविणार

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (युनाइटेड नॅशन्स सिक्युरिटी कौन्सिल – यूएनएससी ) बैठकीचे अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. यूएनएससीच्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान होणार आहेत. गेल्या ७५ वर्षात पहिल्यांदा भारताचे पंतप्रधान यूएनएससीच्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवणार आहेत, असं संयुक्त राष्ट्रातील भारताचे माजी स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरूद्दीन यांनी सांगितलं आहे. भारत आज रविवारी यूएनएससीचा अध्यक्ष बनला आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील भारताचा हा आठवा कार्यकाळ असून या बैठकीचे अध्यक्षपद स्वीकारण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची बैठक संपूर्ण ऑगस्ट महिन्यापर्यंत चालणार आहे. भारताच्या ७५ वर्षांच्या इतिहासातील एखाद्या राजकीय नेत्याने, पंतप्रधानांने अशा प्रकारचे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारणे ही पहिलीच गोष्ट आहे. संयुक्त राष्ट्राच्या नियमांनुसार, सुरक्षा परिषदेतील स्थायी आणि अस्थायी सदस्य राष्ट्रांना क्रमाने अध्यक्षपद दिले जाते. भारत सध्या संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिदषेचा अस्थायी सदस्य देश असून या वेळचे अध्यक्षपद भारताच्या पारड्यात पडलं आहे. भारत २०२१ आणि २०२२ या वर्षांसाठी युक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिदषेचा अस्थाई सदस्य आहे. सोमवारी भारताचे राजदूत टीएस तिरुमूर्ती संयुक्त राष्ट्र मुख्यालयात पत्रकार परिषद घेणार आहेत.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे (यूएनएससी) अध्यक्षपद मिळाल्याबद्दल रशियाने भारताचं अभिनंदन केलं आहे. भारताच्या अजेंड्यामुळे ते खरोखर प्रभावित झाले आहेत, असं देखील म्हटलं आहे. भारत दहशतवादविरोधी, शांतता आणि सागरी सुरक्षा यासारख्या जागतिक मुद्द्यांवर भर देत असल्याचं रशियाने म्हटलं आहे. भारतातील रशियाचे राजदूत निकोल कुदाशेव यांनी ट्विट करत भारताचं अभिनंदन केलं आहे. यूएनएससीचे अध्यक्षपद मिळाल्याबद्दल भारताचे अभिनंदन! भारत ज्या पद्धतीने दहशतवादविरोधी, शांतता आणि सागरी सुरक्षेचे मुद्दे उपस्थित करत आहे, आम्ही खरोखर प्रभावित झालो आहोत, असं ट्विट रशियाच्या भारतातील राजदूत यांनी केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button