आरोग्य

धोक्याची घंटा कायम! महाराष्ट्रात २४ तासांत तब्बल ५७,०७४ नवे रुग्ण

मुंबईतही दिवसभरात ११,१६३ कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे कठोर निर्बंधाची घोषणा रविवारी करण्यात आलीय. त्याचबरोबर विकेंड लॉकडाऊनची घोषणाही करण्यात आलीय. अशास्थितीत राज्याची चिंता वाढवणारी अजून एक बातमी आहे. राज्यात गेल्या 24 तासांत तब्बल 57 हजार 74 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 27 हजार 508 जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. त्याचबरोबर राज्यात आज तब्बल 222 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नव्या आकडेवारीसह राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 30 लाख 10 हजार 597 झाली आहे. त्यातील 25 लाख 22 हजार 823 जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. तर 55 हजार 878 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 30 हजार 503 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

मुंबईतही झपाट्याने वाढ

मुंबईतील कोरोनारुग्णांची संख्याही झपाट्याने वाढतेय. मुंबईत आज दिवसभरात 11 हजार 163 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 5 हजार 263 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत दिवसभरात 25 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 18 जणांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 13 पुरुष तर 12 महिलांचा समावेश आहे. मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचे 82 टक्के आहे. तर मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचं प्रमाण 42 दिवसांवर येऊन ठेपलंय.

पुण्यातील कोरोना स्थिती

पुण्यात आज दिवसभरात 6 हजार 225 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 3 हजार 762 जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात आज दिवसभरात 52 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील 11 मृत रुग्ण पुण्याबाहेरील होते. पुण्यात सध्या 21 हजार 940 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नव्या आकडेवारीसह पुण्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 90 हजार 44 वर पोहोचलीय. त्यातील 2 लाख 42 हजार 652 जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. तर पुण्यात आतापर्यंत 5 हजार 452 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button