क्षत्रिय मराठा कदम परिवाराचे चौथे राज्यस्तरीय स्नेहसंमेलन जानेवारीत होणार
ठाणे (अमोल कदम) : इतिहास काळात एकेकाळी सत्ताधीश असलेल्या ‘कदम’ घराण्याचे चौथे राज्यस्तरीय स्नेहसंमेलन यावर्षी गलांडवाडी (दौंड, पुणे ) येथे जानेवारी २०२२ मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. सलग चौथ्या वर्षी होणाऱ्या राज्यस्तरीय स्नेहसंमेलनाचे ठिकाण निश्चिती आणि नियोजन बैठक गलांडवाडीमध्ये पार पडली.
कदम घराण्याचा इतिहास सर्व कदम बंधू, भगिनींना कळावा तसेच कदमांचा विस्तार होउन प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या कदम बांधवांना मदत व्हावी, कदम घराण्यात उच्चस्तरीय पातळीवर यश संपादन केलेल्यांचा सन्मान करणे याकरिता मागील कित्येक वर्षांपासून सुरू असलेले प्रयत्न आता सत्यात उतरत आहेत. क्षत्रिय मराठा कदम परिवार महाराष्ट्र राज्य कदम घराण्याचे राज्यस्तरीय पहिले स्नेहसंमेलन तुळजापूर येथे, दुसरे स्नेहसंमेलन गिरवी, फलटन, सातारा येथे, तर तिसरे स्नेहसंमेलन तळ कोकणात गढीताम्हाणे, सिंधुदुर्ग येथे मोठ्या उत्साहात पार पडली असून आणि चौथे राज्यस्तरीय स्नेहसंमेलन शनिवार दिनांक २२ जानेवारी, रविवार २३ जानेवारी २०२२ रोजी गलांडवाडी, दौंड, पुणे जिल्हा या गावी घेण्यात येणार असल्याचे संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्र राज्य, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात तसेच देशभरातून आणि परदेशातून देखील येणाऱ्या कदम बंधूंसाठी व्यवस्था उत्तमरीत्या व्हावी, यासाठी रविवारी सविस्तर चर्चा झाली. या नियोजन बैठकीस क्षत्रिय मराठा कदम परिवार महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दादासाहेब कदम (गिरवी सातारा), सचिव- रामजी कदम ( माणगाव रायगड), कोषाध्यक्ष- राजेंद्र कदम ( खालापूर ), मुख्य कार्यकारिणी सदस्य अमोल कदम (करंजवडे, भिवंडी), चंद्रशेखर कदम (चिपळूण, रत्नागिरी), डाॅ. प्रविण कदम (दौंड, पुणे), गणेश कदम (सांगली) तसेच पुणे येथील प्रख्यात उद्योजक माऊलीशेठ कदम, गलांडवाडी सरपंच गजानन कदम, भाऊसाहेब कदम, मंदार कदम, नरेश कदम, योगेश कदम, स्वप्निल कदम तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.