![](https://dg24.in/wp-content/uploads/2022/01/Novak-Djokovics.jpg)
मेलबर्न : सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत खेळणार असल्याचे बोलले जात असताना ऑस्ट्रेलियाकडून त्याचा व्हिसा पुन्हा रद्द करण्यात आलाय. जोवाक नोकोविचनं कोरोना प्रतिबंध लस घेतलेली नाही. ज्यामुळं समुदायाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, असं मत मांडत ऑस्ट्रेलियाचं इमिग्रेशन मंत्री अॅलेक्स हॉल यांनी जोकोविचचा व्हिसा रद्द केलाय.
ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी नोवाक जोकोविच मेलबर्न विमानतळावर पोहोचला होता. त्यानंतर जोकोविचला विमानतळावर काही तास थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर देशात प्रवेशासंबंधी आवश्यक कागदपत्रं सादर न केल्यामुळं त्यांचा व्हिसा रद्द करण्यात आला होता. दरम्यान, व्हिसाप्रकरणी टेनिसपटू नोवाक जोकोविचनं ऑस्ट्रेलिया सरकारविरोधातील खटला जिंकला होता. व्हिसा रद्द करणे आणि डिटेन्शन चुकीचं असल्याचा निर्वाळा कोर्टानं दिला. तसेच त्याला त्याचा पासपोर्ट परत करण्यात आला होता. परंतु, ऑस्ट्रेलियाचे इमिग्रेशन मंत्री अॅलेक्स हॉकनं जोकोविचचा व्हिसा रद्द केलाय. आज मी स्थलांतर कायद्याच्या कलम १३३ सी (३) अंतर्गत आरोग्य आणि इतर मुद्यांच्या आधारावर नोवाक जोकोविचचा व्हिसा रद्द करण्यासाठी माझ्या अधिकाराचा वापर केलाय. जनहितासाठी हा निर्णय घेण्यात आलाय, असं अॅलेक्स हॉक म्हणाले आहेत.
नोवाक जोकोविचनं ऑस्ट्रेलियाहून क्रोएशियाला रवाना होण्यापूर्वी सांगितलं होतं की, वैद्यकीय कारणांमुळे त्याला लसीपासून सूट देण्यात आली. जोकोविचसह आणखी २६ अर्जदारांनी लसीकरणाशिवाय ऑस्ट्रेलियात प्रवेश करण्यासाठी अर्ज केला होता, असं टेनिस ऑस्ट्रेलिया आणि व्हिक्टोरियन राज्य सरकारनं सांगितलं होतं. परंतु, जोकोविचनं वैद्यकीय कारणांमुळं कोविड-१९ ची लस घेतलेली नाही. जर जोकोविच वैद्यकीय कारणं सिद्ध करू शकला नाही, तर त्याला ऑस्ट्रेलियात प्रवेश दिला जाणार नाही, असं ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी म्हटलं होतं.