Top Newsराजकारण

नारायण राणेंची उद्धव ठाकरेंसमोर तुफान टोलेबाजी

सिंधुदुर्ग : चिपी विमानतळ उद्घाटनासाठी आज केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी नारायण राणे यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी सिंधुदुर्गमध्ये स्वतः केलेल्या विकासकामाचा पाढाही वाचला आणि विकास कामांवरून ठाकरे सरकारला टोमणेही मारले. राणे यांनी स्टेजवरच मुख्यमंत्री उद्वव ठाकरेंकडे शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींची तक्रार केली. उद्धवजी, तुम्हाला चुकीची माहिती ब्रीफिंग केली जात आहे. त्यात सत्य नाही. तुमचे लोकप्रतिनिधी काय करतात याची मााहिती तुम्ही गुप्तपणे घ्या, असं राणे म्हणाले.

सर्व माहिती मिळते. तुम्हाला ब्रीफ होतं. पण ती माहिती चुकीची आहे. तुम्ही माहिती घ्या. गुप्तपणे माहिती घ्या. तुमचे लोक काय करतात याची माहिती घ्या. तुम्हाला सत्य कळेल, असं सांगतानाच बाळासाहेबांना खोटं बोलणं कधी आवडलं नाही. खोट्याला त्यांनी थारा दिला नव्हता. वाईट बुद्धीने बोलायचं. यायचं हे चांगलं नाही. चांगल्या मनाने या. आम्ही तुमचं स्वागत करू, असं राणे म्हणाले.

राणे म्हणाले, हा चिपी विमानतळाचे उदघाटन हा माझ्या जीवनातील अत्यंत महत्वाच क्षण आहे. या वेळी कुठलेही राजकारण करू नये, असे मला वाटत होते आणि आकाशात उडणारे विमान डोळे भरून पाहावे, असे वाटत होते. म्हणून स्तुत्य हेतूने मी या कार्यक्रमासाठी आलो आहे. मंचावर येताना मुख्यमंत्री साहेबही मला भेटले. ते माझ्या काणातही काही बोलले. पण मी ते ऐकले नाही. असो, परदेशातून पर्यटक येथे यावेत, येथील लोकांना रोजगार मिळावा. येथील लोक समृद्ध व्हावेत यासाठी या विमानतळासाठी प्रयत्न केले.

हे सर्व बाळासाहेबांचेच !

मी १९९० साली जिल्ह्यात आलो, तेव्हा जिल्ह्यात, पाण्याचा प्रश्न होता, रस्त्ये व्यवस्थित नव्हते, शाळा व्यवस्थित नव्हत्या, विजेचा प्रश्न होता. लोक आंधारात राहायचे. सिंद्धुदुर्ग मुंबईवर अवलंबून होता. यानंतर, या भागाचा विकास मी केला. उद्धवजी हे सर्व मी बाळासाहेबांच्या प्रेरणेतून करत होतो. यात माझा कसलाही स्वार्थ नव्हता. एथे एकाच वेळा मी तीनशे हून अधिक शिक्षक आणले होते. पण तेव्हा मी शिवसेनेत होते. ते सर्व साहेबांचेच श्रेय, माझं नाही.

साहेबांचे आशिर्वाद होते, त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो. त्यावेळी गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते, त्यांना रस्ते आणि पायाभूत सुविधांसाठी १२० कोटी दिले. त्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी ११८ कोटी रुपये दिले. जिल्ह्याला ८०-९० लाख यायचे मी ते १०० कोटी दिले. सुविधांसाठी कारणीभूत नारायण राणे आहे, दुसरा कोणी जवळ येऊच शकत नाही. इथल्या शाळा वर्ग, इथे मी एकाचवेळी ३४० शिक्षक आणले, राज्यात पहिल्या टॉपमध्ये सिंधुदुर्गातील विद्यार्थी होते. त्याला कारणीभूत कोण हे जनतेला माहितीय त्याचे श्रेय़ मी घेत नाही, त्यावेळी शिवसेनेत होतो, साहेबांचं श्रेय होतं मी निमित्त होतो. जसं सचिन बॅटिगं करतो. पण स्वत: श्रेय घेत नाही. स्कोर केला ते बॅटने केला असं तो सांगतो. तसंच मी काही केलं नाही. मला शिवसेनाप्रमुखांनी संधी दिली. मी केवळ निमित्त मात्र ठरलो, असंही त्यांनी सांगितलं.

त्यावेळी आंदोलनं कोणी केली?

उद्ववजी विनंती आहे. याच जागेवर मी भूमिपूजन करायला आलो. त्यावेळी आंदोलन होत होतं. भूमिपसंपादन करून देणार नाही. आम्हाला विमानतळ नको. आपल्या त्यावेळच्या राजवटीत मी मंजूर केलं. किती विरोध किती विरोध… मी नाव घेतलं तर राजकारण होईल. आज हायवे. अजित पवारांनी नाव घेतलं. हा हायवे ठिकठिकाणी अडवण्यात आला. आमचं काय भागवा आणि रस्ता सुरू करा. कोण अडवत होतं. विचारा जरा. सी वर्ल्डसाठी अजित पवारांनी १०० कोटी दिलं. काय झालं हो. कोणी सी वर्ल्ड कॅन्सल केलं. भांडं काय फोडायचं किती फोडायचं. तुम्ही समजतात तसं नाहीये. म्हणून परिस्थिती बदलतेय, असंही त्यांनी सांगितलं. साहेबांच्या आशीर्वादानं मी मुख्यमंत्री झालो. आज जे इन्फ्रास्ट्रक्चर दिसतंय त्याचा उभारणीला राणेंचं योगदान आहे. दुसरा कुणी इथे येऊच शकत नाही.

सचिन तेंडुलकर बॅटिंग करताना क्रेडीट टीमला द्यायचा. तसं माझं आहे. उद्धव ठाकरे साहेब तुम्हाला एक विनंती आहे. याच जागेवर मी व प्रभू साहेब भूमिपूजनासाठी आलो. त्यावेळी काही लोक समोर आंदोलन करत होते. विमानतळ नको म्हणत होते. मी नाव घेतलं तर राजकारण होईल. आमचं भागवा आणि रस्ता सुरु करा, अशी मागणी करायचे. रस्ता कोण अडवतं विचारा जरा, अशा शब्दात नारायण राणे यांनी शिवसेना नेत्यांवर टीकास्त्र डागलं.

मला आज कळलं विमानतळाचे मालक कोण? म्हसकर गेले आणि दुसरे आले. विनायक राऊतांनी स्टेजवरुन सांगितलं. विमानतळ काय देसाई कंपनीचं आहे काय? बाळासाहेबांना खोटं बोलणं कधीच आवडलं नाही. खोटं बोलणाऱ्यांना साहेबांकडे थारा नव्हता. तुम्हाला मिळणारी माहिती खरी नाही, असं आवाहनही राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केलंय.

मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो, विमानतळाच्या आजूबाजूला सुशोभीकरण आवश्यक आहे. त्यासाठी निधी द्या. अजित दादा पैसे द्या. या परिसराचा विकास व्हायला हवा. येथील लोकांचा विकास करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करीन. केंद्रात उद्योग मंत्री आहे. ८० टक्के उद्योग माझ्याकडे येतात. समुद्र किनारी काय काय उद्योग होऊ शकतात. त्यासाठी मार्गदर्शन करा. त्यासाठी एमआयडीसीची साथही आवश्यक आहे. हा जिल्हा सुजलाम सुफलाम करणे माझा उद्देश आहे. कितीही आडचणी निर्माण केल्या तरी मी त्याची दखल घेत नाही, असेही राणे म्हणाले.

यावेळी त्यांनी खासदार विनायक राऊत यांना टोला लगावला. विनायक राऊत पेढे द्यायला आले. मी अर्धा पेढा घेतला. मी त्यांना म्हणालो पेढ्याचा गुणधर्म गोड आहे. तो गुणधर्म आत्मसात करा. बोलायचं तेव्हा हसत बोला. विचारातून माणसांची मतं जिंकता येतात हे मी सांगायला नको. असो, सर्व मंत्री आलेत. सिंधुदुर्गात वाहतूक-विमान सुरु करायला. त्यांना चांगलं आरोग्य मिळावं यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो. विमानतळाच्या आजूबाजूला सौंदर्य मिळावं यासाठी खर्च करा, अशी विनंती अर्थमंत्री अजित पवारांना करतो. इतथल्या लोकांना चांगला रोजगार मिळेल. त्यांना उभं करण्याचं काम आम्ही सगळेच करू, असं त्यांनी सांगितलं.

आदित्य माझ्यासाठी टॅक्स फ्री

तुम्ही आलात हे बरं वाटलं. आनंद वाटलं. सन्मानिय आदित्य ठाकरे हे पर्यटन मंत्री आहेत. त्यांनी अभ्यास करावा. त्यांनी टाटाचा रिपोर्ट वाचावा. आदित्य माझ्यासाठी टॅक्स फ्री आहे. मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही, असं ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button