अर्थ-उद्योग

टाटा मोटर्सचा ३-अॅक्‍सल ६x२ ट्रक ‘सिग्‍ना ३११८.टी’ लाँच

मुंबई : टाटा मोटर्स या भारताच्‍या सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने आज एमअॅण्‍डएचसीव्‍ही विभागातील नवीन ऑफरिंग – टाटा सिग्‍ना ३११८.टी सादर केला. या भारताच्‍या पहिल्‍या ३-अॅक्‍सल ६x२ (१० चाकी) प्रबळ ट्रकचे ग्रॉस वेईकल वेट (जीव्‍हीडब्‍ल्‍यू) ३१ टन आहे. टाटा मोटर्स अभियांत्रिकी क्षमता व तंत्रज्ञान वर्चस्‍वाच्‍या माध्‍यमातून ग्राहकांसाठी ग्राहक-केंद्रीत नवोन्‍मेष्कारी उत्‍पादन सोल्‍यूशन्‍स सादर करण्‍यामध्‍ये नेहमीच अग्रस्‍थानी राहिली आहे.

टाटा सिग्‍ना ३११८.टी मध्‍ये ग्राहकांसाठी महसूल व कार्यसंचालन खर्चासंदर्भात मूल्‍याचे अद्वितीय मिश्रण आहे. संबंधित २८-टन जीव्‍हीडब्‍ल्‍यू प्रबळ ट्रकच्‍या तुलनेत ३,५०० किग्रॅ* उच्‍च प्रमाणित पेलोड आणि समानुपाती कार्यसंचान खर्च, तसेच २८ टन ट्रकप्रमाणेच इंधन, टायर व मेन्‍टेनन्‍स खर्चासह हे उत्‍पादन ग्राहकांसाठी निव्‍वळ कार्यसंचालन नफा २८-टन ट्रकच्‍या तुलनेत लक्षणीयरित्‍या जवळपास ४५ टक्‍क्‍यांनी वाढवते. संबंधित २८-टन ट्रकच्‍या तुलनेत सिग्‍ना ३११८.टी मध्‍ये अधिक गुंतवणूक कार्यसंचालनांच्‍या एक वर्षाच्‍या आत परत मिळू शकते आणि त्‍यानंतर वर्षानुवर्षे वाढीव उत्‍पन्‍न मिळू शकते.

या नवीन मॉडेलच्‍या सादरीकरणाबाबत बोलताना टाटा मोटर्सच्‍या कमर्शियल वेईकल बिझनेस युनिटच्‍या विक्री व विपणन विभागाचे उपाध्‍यक्ष श्री. राजेश कौल म्‍हणाले, ”सिग्‍ना ३११८.टी हा टाटा मोटर्सच्‍या ग्राहक सर्वोत्तमतेप्रती प्रवासामधील उल्‍लेखनीय टप्‍पा आहे. या मॉडेलमधून टाटा मोटर्सने स्‍थापित केलेली अ‍द्वितीय ग्राहक-केंद्री रचना व मूल्‍य तत्त्व दिसून येते. फ्यूएल इकोनॉमी स्विच, गिअर शिफ्ट अ‍ॅडवायजर, आयसीजीटी ब्रेक्‍स, इनबिल्‍ट अॅण्‍टी-फ्यूएल थेफ्ट असलेली फ्लीट एज टेलिमॅटिक्‍स यंत्रणा, रिव्‍हर्स पार्किंग असिस्‍टण्‍स यांसारखी बहुमूल्‍य वैशिष्‍ट्ये अग्रणी वेईकल डिझाइनला साजेशी आहेत, ज्‍यामुळे आधुनिक ग्राहकांच्‍या अपेक्षा अधिक वाढतच जातात. एलएक्‍स व्‍हर्जनमध्‍ये देखील एअर कंडिशनिंग व युनिटाइज्‍ड व्‍हील बेअरिंग्‍ज आहेत. हे मॉडेल महसूल वाढवणा-या मॉडेलच्‍या माध्‍यमातून लाभ क्षमता वाढवण्‍याचा प्रयत्‍न करणा-या ग्राहकांसाठी निवडीची रेंज देते.”

टाटा सिग्‍ना ३११८.टी त्‍याच्‍या १२.५-टन ड्युअल टायर लिफ्ट अॅक्‍सल कन्फिग्‍युरेशनसह एमअॅण्‍डएचसीव्‍ही विभागातील व्‍हाईट क्षेत्राच्‍या बहुमूल्‍य शोधाला सादर करतो. हा ट्रक लिफ्ट अॅक्‍सल खाली असताना ३१-टन जीव्‍हीडब्‍ल्‍यूमध्‍ये, तर लिफ्ट अॅक्‍सल वर असताना १८.५-टन जीव्‍हीडब्‍ल्‍यूमध्‍ये कार्यसंचालन करू शकतो, ज्‍यामधून विविध उपयोजन गरजांसाठी कार्यसंचालन पेलोडच्‍या व्‍यापक बँडची खात्री मिळते. लिफ्ट अॅक्‍सल वर असताना कार्यसंचालन टँकर ग्राहकांसाठी लाभदायी आहे, ज्‍यामधून त्‍यांना ट्रक रिकामा परतत असताना उच्‍च फ्यूएल इकोलॉमी मिळण्‍याची खात्री मिळते. हा ट्रक सर्व प्रकारच्‍या टँकर उपयोजनांसाठी अत्‍यंत योग्‍य आहे जसे पेट्रोलियम, तेल व ल्‍युब्रिकण्‍ट्स (पीओएल), रसायने, बिटूमेन, खाद्यतेल, दूध व पाणी, तसेच औद्योगिक सामान जसे पॅक केलेले एलपीजी सिलेंडर्स, ल्‍युब्रिकण्‍ट्स, कृषी उत्‍पादने इत्‍यादी. सिग्‍ना ३११८.टी २५केएल पीओएल टँकरसाठी पेट्रोलियम अॅण्‍ड एक्‍स्‍प्‍लोसिव्‍ह्ज सेफ्टी ऑर्गनायझेशनद्वारे (पीईएसओ) प्रमाणित आहे. ही क्षमता १०-चाकी, २८-टन जीव्‍हीडब्‍ल्‍यू ट्रकसाठी मान्‍यता देण्‍यात येणा-या क्षमतेपेक्षा २केएलने सर्वोच्‍च आहे.

उत्‍पादनाचे व्‍हेरिएण्‍ट्स व वैशिष्‍ट्ये:

टाटा ३११८.टी एलएक्‍स, सीएक्‍स व्‍हर्जन्‍स आणि काऊल व्‍हेरिएण्‍ट्सह सिग्‍ना अवतारामध्‍ये २४-फीट व ३२-फीट लोड क्षमतांमध्‍ये येतो. १८६ अश्‍वशक्‍ती व ८५० एनएम टॉर्क देणारे कमिन्‍स बीएस-६ इंजिनची शक्‍ती असलेल्‍या टाटा सिग्‍ना ३११८.टी मध्‍ये जी९५० ६-स्‍पीड ट्रान्‍समिशन व अत्‍यंत टिकाऊ अॅक्‍सल्‍स आहेत. हा ट्रक ‘पॉवर ऑफ ६ व्‍हॅल्‍यू’ तत्त्वांतर्गत टाटा मोटर्सच्‍या प्रॉडक्‍ट अॅट्रिब्‍यूट लीडरशीप धोरणामधून उदयास आला आहे.

मूल्‍यवर्धित सेवांचा समूह, संपूर्ण सेवा २.० अंतर्गत सेवेचे वचन आणि ६वर्षे/ ६ लाख किलोमीटर्स अंतरापर्यंतच्‍या प्रमाणित ड्राइव्‍हलाइन वॉरण्‍टीच्‍या खात्रीसह टाटा सिग्‍ना ३११८.टी राज्‍ये व बाजारपेठांमध्‍ये टप्‍प्‍याटप्‍प्‍याने सादर करण्‍यात येईल. ग्राहक-केंद्री दृष्टिकोनासह भारतीय रस्‍ता परिवहनासाठी उल्‍लेखनीय उत्‍पादने सादर करण्‍याचा सातत्‍यपूर्ण प्रयत्‍न कायम राखत टाटा मोटर्सने पुन्‍हा एकदा व्‍यावसायिक वाहन क्षेत्राला प्रामाणिक भावनेसह उद्योगक्षेत्रात अग्रणी राहण्‍यासाठी घ्‍यावी लागणारी मेहनत दाखवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button