राजकारण

तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा है, हमारा दौर फिरसे आयेगा!

अधिवेशनाचा आखाडा मुनगंटीवार यांनी गाजवला

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजवलं. या संपूर्ण अधिवेशनात फडणवीस यांना विधानसभेत तडाखेबंद साथ मिळाली ती ज्येष्ठ भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची. मुनगंटीवार यांनी आघाडी सरकारच्या लव्ह जिहादपासून ते राष्ट्रपती राजवटीपर्यंतचा घणाघात करून राज्य सरकारला सळो की पळो करून सोडलं. फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यानंतर अधिवेशनाचा आखाडा मुनगंटीवार यांनी गाजवला.
भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir mungantiwar)यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा येण्याची गळच घातली पण त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही परत या असे सांगत भाजपचे दरवाजे अजूनही अजित पवार यांच्यासाठी उघडे असल्याचेच संकेत दिले. यामुळे यावर पवार यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी सगळ्यांच्या नजरा अजित दादांकडे वळल्या. दरम्यान, याप्रसंगी शेरो शायरीच्या माध्यमानेही दोन्ही पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केल्याचे बघायला मिळाले.

सचिन वाझे प्रकरणावरून काल आरोपांच्या फैरी झाडत विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना घाम फोडला होता. यामुळे आजही त्यांचा आक्रमक अवतार बघायला मिळतोय की काय अशी धाकधुक सत्ताधाऱ्यांना होतीच. पण फडणवीस यांच्याबरोबरच सुधीर मुनगंटीवर यांनीही भाजपची कमान सांभाळत महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं. आम्ही वैधानिक मंडळांचा आग्रह करत होते. पण आमची कवचकुंडल काढली. विदर्भ आणि मराठवाड्याला १ टक्के निधी कमी केला. असे सांगत मुनगुंटीवार यांनी दादा तुम्ही अधिकाऱ्यांवर अवलंबून राहू नका असा टोलाही त्यांनी हाणला.

त्याचवेळी मुनगंटीवर यांना थांबवण्याचा प्रयत्न नाना पटोले यांनी केला असता तुम्ही महाराष्ट्राचे पप्पू होऊ नका असे उपहासात्मक विधान मुनगंटीवार यांनी केले. त्यानंतर त्यांनी अजित पवारांकडे आपला मोर्चा वळवला. ‘मला प्रश्न पडला आहे की, अजितदादा तुमच्यावर टीका करायची का नाही. कारण पुन्हा तुम्ही कधी मित्र व्हाल. महाराष्ट्र वाचवण्यासाठी जी ताकद लावायची ती लावा, देवेंद्रजी तुम्हाला पुन्हा यावंच लागेल. अजितदादा तुम्ही पण या हरकत नाही, अशी ऑफरच मुनगंटीवार यांनी अजितदादांना दिली. एवढं बोलून ते थांबले नाहीत तर त्यांनी, ‘कुछ देर की खामोशी है, फिरसे शोर आयेगा, तीन महिने की दूरी है, फिरसे हमारा दौर आयेगा’ असा शेर मारत मुनगंटीवार यांनी फडणवीस यांच्या मी परत येणार या वाक्याचे स्मरणच केलं.

त्याचबरोबर गृहमंत्री अनिल देशमुख अनिल देशमुख यांचं वक्तव्य दुर्देवी होतं. ठाकरे सरकारला ठार करे सरकार करायचं आहे का? काही पक्षांचे चीनवर प्रेम आहे काही जणांचे सचिनवर (वाझे) प्रेम आहे. हे सरकार शरम प्रुफ आहे. आरोपींना वाचवण्यासाठी विदर्भातल्या माणसाला गृहमंत्रिपद दिले, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला.

त्यानंतर अनिल देशमुख यांनी ‘मुनगंटीवार यांनी सगळ्या मंत्र्यांची नावं घेतली. तसेच तुम्ही देवेंद्रजींपेक्षा सीनियर होतात पण मुख्यमंत्री ते झाले. तुमच्या मनातलं दुःख मला कळत होतं. तुम्ही खोटं हसून ते सांभाळत होतात. ‘तुम इतना क्यू मुस्करा रहे हो ? क्या गम है जिसको छुपा रहे हो’ असा शेर करत देशमुख यांनी मुनगंटीवार यांनाही टोला लगावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button