राजकारण

आगामी विधानसभेसाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा

मुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. स्थानिक पातळीवरही महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवल्या आहे. पण, आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा नारा पुन्हा एकदा दिला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नाना पटोले यांनी पक्षसंघटनेला मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. आज नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक महाराष्ट्र शाखेच्या राज्यस्तरीय कार्यकारिणीची ऑनलाईन बैठक पार पडली. यावेळी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार, असा निर्धार पटोले यांनी बोलून दाखवला. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर कामगार कायदे मोडीत काढले आहे. सर्व कायदे आता मालकाच्या बाजूने गेले असून कामगार देशोधडीला लावण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. पण, राज्यात कामगार विरोधी कायदे राज्यात लागू होऊ देणार नाही, असंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी काँग्रेस पक्ष लढा देत आला आहे. सत्तेत असताना कामगार हिताचे कायदे बनवले होते. पण, सध्या केंद्रात असलेल्या सरकारने शेतकरी, कामगारांच्या विरोधात कायदे तयार करत आहे. काँग्रेस या विरोधात लढा देत राहील, असंही पटोले म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button