आरोग्यशिक्षण

गुरु गोबिंद सिंग फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थी लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद 

नाशिक : गुरु गोबिंद सिंग फाउंडेशन आणि नाशिक महानगर पालिका सार्वजनिक आरोग्य केंद्र, वडाळा गाव यांच्या संयुक्त विद्यमाने  कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गुरु गोबिंद सिंग फाउंडेशन मधील १५ ते १८ वयोगटातील गुरु गोबिंद पब्लिक स्कुल आणि जुनियर कॉलेज, पॉलिटेकनिक आणि इंजिनिअरिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा समावेश होता.

लसीकरण मोहीम ६ आणि ७ जानेवारीला गुरु गोबिंद सिंग पब्लिक स्कुलमध्ये राबविण्यात आली.  ७ जानेवारीला ६७४ विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करून नाशिक विभागामध्ये सर्वोत्तम लसीकरणाचा विक्रम नोंदविला. या दोन दिवसांमध्ये सुमारे ९०० विद्यार्थांचे लसीकरण झाले.

या लसीकरण मोहिमे करिता वडाळा गाव आरोग्य केंद्राचे डॉ. अशोक गायकवाड, श्रीमती दीपिका मोरे, सहकारी ज्येष्ठ परिचारिका संगीतl सातपुते यांच्या सहकार्यातून लसीकरण करण्यात आले. लसीकरण मोहिमेकरीता गुरु गोबिंद सिंग फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर डॉ. परमिंदर सिंग यांनी लसीकरण मोहीम यशस्वी पार पडल्याबद्दल फाउंडेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले. तसेच पालकांचे, विद्यार्थांचे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले. कोरोना प्रादुर्भाव रोखण्याकरिता खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. लसीकरण मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करण्याकरिता  प्राचार्य ज्योती सामंत, तसेच हेडमास्टर्स सुनीता प्रसाद, इंदू जैन, चंचल ठाकूर, आशिष गाकवाड, उत्तम आडके, मानसिंग विनोद मुसळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे कुलसचिव मनोज कोळी आणि डिव्हिजनल नोडल ऑफिसर डॉ. विनोद पावसकर यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button