आरोग्य

राज्यात दिवसभरात पुन्हा ६२ हजारांवर नवे कोरोना रुग्ण

मुंबई : काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत घट दिसून येत असतानाच गुरुवारी पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ६२ हजार १९४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ८५३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४९ लाख ४२ हजार ७३६ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ७३ हजार ५१५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात ६३ हजार ८४२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण ४२ लाख २७ हजार ९४० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.५४ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के एवढा असून ६ लाख ३९ हजार ७५ रुग्णांवर अजून उपचार सुरू आहेत.

आज नोंद झालेल्या एकूण ८५३ मृत्यूंपैकी ३३१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २४७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २७५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २७५ मृत्यू, नाशिक- ९६, पुणे-५२, नांदेड-२०, ठाणे- २०, बीड- ११, बुलढाणा- ५, चंद्रपूर- ५, गडचिरोली- ५, जळगाव- ५, नागपूर- ५, रायगड- ५, सोलापूर- ५, भंडारा- ४, हिंगोली- ४, जालना-४, लातूर- ४, गोंदिया- ३, कोल्हापूर- ३, नंदूरबार- ३, वर्धा- ३, अहमदनगर- २, औरंगाबाद- २, रत्नागिरी-२, सांगली- २, अकोला- १, धुळे- १, सातारा- १, वाशिम- १ आणि यवतमाळ- १ असे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button