राजकारण

ओबीसींचं नेतृत्व संपवणाऱ्या भाजपला ओबीसींचा कळवळा कधीपासून? : रोहिणी खडसे

मुंबई – मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सरकार केवळ घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले, अशी टीका भाजपाकडून करण्यात आली आहे. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यानंतर, राष्ट्रवादीच्या नेत्या आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसेंनी भाजपवर टीका केली आहे.

ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास ठाकरे सरकारच जबाबदार असल्याची टीका भाजपा नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यावरून, देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. ओबीसी समाजाचा विश्वासघात राज्य सरकारकडून होत आहे, असे म्हणत भाजपाकडून तीव्र आंदोलनाचा इशाराच देण्यात आला आहे. एकतर राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपले. मंत्री म्हणतात, हे आरक्षण पुनर्स्थापित होत नाही, तोपर्यंत निवडणुका होणार नाहीत आणि दुसर्‍याच दिवशी निवडणुका जाहीर होतात, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले. फडणवीस यांनी ओबीसींच्या आरक्षणाबाबत संताप व्यक्त केल्यानंतर रोहिणी खडसेंनी भाजपला सवाल केला आहे.

भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?. आता गळा काढण्यात अर्थ नाही, असे ट्विट रोहिणी खडसेंनी केलं आहे. रोहणी खडसेंनी भाजपसह फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button