राजकारण

निवडणुका पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव : आ. आशिष शेलारांचा आरोप

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवसेनेला पराभवाची भीती असल्यामुळे हा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहा:कार माजला आहे. कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली नाही आटोक्यात आली तरी ती संपली नाही आणि आता तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेवर उपाययोजना करायला लागणार आहेत. यावर भाजपचेही मत तेच आहे परंतु याचे कारण पुढे करुन जनगणना करता येणार नाही, निवडणुका घेता येणार नाहीत, नव्याने मतदार नोंदणीत अडथळे येतील यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याचा डाव शिवसेनेचा आहे परंतु हा डाव भाजप हाणून पाडेल असा घणाघात भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे.

कोरोनाच्या महामारीचे कारण पुढे करुन सत्ताधारी शिवसेना आणि महाविकास आघाडीचा अजून २ वर्षे निवडणूका पुढे ढकलण्याचे कुटील कारस्थान सुरु आहे. हे कारस्थान जनतेसमोर आणला आहे. असा कारस्थानचा प्रयत्न सत्ताधारी शिवसेनेनं केला तर तो बेकायदेशीर असेल आम्ही त्याला आव्हान देऊ आणि अशा प्रकारच्या प्रयत्नांना हाणून पाडल्याशिवाय भाजप राहणार नाही असे भाजप नेते आशिष शेलार यांनी सांगितले आहे.

शिवसेना आणि महाविकास आघाडीकडून चौथा प्रयत्न सुरु आहे. मुंबईतील ३० प्रभागांना टार्गेट करुन फोडायचे कटकारस्थान सुरु आहे. शिवसेना आणि काँग्रेसला आजन्म कधीही या प्रभागात जिंकता येणार नाही अशा प्रभागांना फोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. ही मंडळी मुंबईकरांच्या जिवानाशी खेळत आहेत. त्यामुळे मुदतपुर्व निवडणूका फेल, नवीन प्रभाग रचना २०११ च्या जनगणनेवर करण्याचा प्रयत्न फेल, २ वर्ष निवडणूका पुढे ढकलण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडू आणि आता ३० वॉर्ड फोडण्याची सुपारी या पद्धतीने शिवसेनेचे कटकारस्थान असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने यामध्ये आपली भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन शेलार यांनी केले आहे. नवीन जनगणनेच्या अगोदर ३० वॉर्ड फोडणं याला समर्थन आहे का? काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे निवडणूका फोड्याच्या कटाला समर्थन आहे का? असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. भाजप कधीही निवडणूका घेतल्या तरी तयार असल्याचे भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

सामनामध्ये डायलॉग वाचत असतो त्याला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायचे झाले तर निवडणुका या रणांगण आहेत. युद्ध आहे समजलं तर युद्ध या संकल्पनेतून त्यांना उत्तर देऊ इच्छितो की आम्ही याबाबतीत तयार आहोत असे म्हणत आशिष शेलार यांनी प्रसिद्ध डायलॉगची आठवण शेलारांनी शिवसेनेला करुन दिली आहे. तो म्हणजे बंदुक भी तेरी..गोली भी तरे.. दीन तारिख भी तेरी..सुबह कहे सुबह… शाम कहे शाम.. इस चुनाव मे भारतीय जनता पार्टी शिवसेनेको परास्थ करणे को तयार है असा डायलॉग आशिष शेलार यांनी मारला आहे.

राज्यातील निवडणूका २ वर्षे पुढे ढकलण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनाला आम्ही खबरदार सांगतो आहे. याचा आमचा विरोध राहीलच परंतु तरिही कायदा आणि कोरोनाची स्थिती हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. तर अशी परिस्थिती निर्माण झाली तर आमची मागणी राहिल की कुठल्याही ठेकेदाराचे प्रस्ताव हे स्थायी समितीच्या समोर न आणता इलेक्शन कमिशनच्या समोर आणावे लागतील. इलेक्शन कमिशनच्या आडमध्ये राहून शिवसेना कट करत असेल तर शिवसेनेची पाप समोर आल्याशिवाय राहणार नाहीत असा घणाघात भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button