राजकारण

सिंघू बॉर्डरवर तरुणाची निर्घृण हत्या

नवी दिल्ली : कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन सुरु असलेल्या सिंघू बॉर्डवर एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मृत तरुणाची हत्या करुन त्याचे हात कापून बॅरिकेट्सला लटकवण्यात आला होता. तर मुंडकही मानेपासून लटकलेल्या अवस्थेत आढळले. मृतदेह सापडल्यानंतर सिंघू सीमेवर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. सुरुवातीला आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांना मुख्य स्टेजजवळ जाऊ दिल नाही. मात्र नंतर कुंडली पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी मृतदेह खाली उतरवत सिव्हिल रुग्णालयात दाखल केला.

सिंघू बॉर्डरवर आंदोलकांच्या मुख्य स्टेजजवळ सकाळच्या सुमारास या तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. या मृत तरुणाचे वय जवळपास ३५ वर्षांच्या आसपास आहे. तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याच्या खुणा आढळल्या आहेत. तसेच त्याचा हात मनगटापासून कापून वेगळा केला आहे. याशिवाय मानेवर देखील शस्त्राने घाव घालत मान धडापासून वेगळी केली आहे. या खुणाचा आरोप निहंग्यांवर केला जात आहे.

ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. इतकेच नाही तर हत्या करुन मृत तरुणाचा मृतदेह जवळपास १०० मीटरपर्यंत फरफटत नेण्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर मृतदेहाला बॅरिगेट्सवर अत्यंत दयनीय अवस्थेत लटवण्यात आले. शुक्रवारी सकाळी आंदोलकांना मुख्य स्टेजजवळ मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

गेल्या ९ माहिन्यांहून अधिक काळ दिल्ली, हरियाणा, आणि उत्तरप्रदेश अशा वेगवेगळ्या सीमेवर तीन कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकरी संघटना आणि सरकार यांच्यात अनेक बैठकाही झाल्या, पण आतापर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही. मात्र शेतकऱ्यांनी कृषी कायदा मागे घेत नाही तोवर आंदोलनाच्या स्थळावरून हलणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button