साहित्य-कला

राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी सदानंद मोरे

मुंबई : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर जेष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय साहित्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान देणारे २९ सदस्यांची पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नियुक्त सदस्यांचे मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. यासंदर्भातील घोषणा मराठी भाषा विभागाने नुकतीच एका शासन निर्णयान्वये केली आहे. नियुक्त करण्यात आलेले सदस्य पुढीलप्रमाणे – सदानंद मोरे (अध्यक्ष), डॉ. प्रज्ञा दया पवार, अरुण शेवते, डॉ. रणधीर शिंदे, श्रीमती निरजा, प्रेमानंद गज्वी, डॉ. नागनाथ कोतापल्ले, प्रवीण बांदेकर, श्रीमती मोनिका मजेंद्रगडकर, भारत सासणे, .मु.शिंदे, डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. रविंद्र शोभणे, योगेंद्र ठाकूर, प्रसाद कुलकर्णी, प्रकाश खांडगे, प्रा. एल. बी. पाटील, पुष्पराज गावंडे, विलास सिंदगीकर, प्रा. प्रदीप यशवंत पाटील, डॉ. आनंद पाटील, प्रा. शामराव पाटील, दिनेश आवटी, धनंजय गुडसुरकर, नवनाथ गोरे, रवींद्र बेडकीहाळ, प्रा. रंगनाथ पठारे, उत्तम कांबळे, विनोद शिरसाठ, डॉ. संतोष खेडलेकर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button