साहित्य-कला

‘फर्टाडोस स्कूल ऑफ म्युझिक’तर्फे संगीत शिक्षणासाठी नवा उपक्रम

भारतातील संगीत शिक्षणाला नवा आकार देण्यासाठी 'लर्न बडी'

पुणे : संगीत एक वैश्विक भाषा आहे आणि कलाविश्वाचा पायाभूत आधार आहे. या अध्ययनाची प्रक्रिया सुलभ करण्याच्या तसेच अनेकविध पद्धतींच्या माध्यमातून अधिक अनुभवात्मक अध्ययनाकडे स्थित्यंतर करण्याच्या उद्देशाने भारतातील आघाडीची संगीत शिक्षण संस्था फर्टाडोस स्कूल ऑफ म्युझिक (एफएसएम) लर्न बडी हे तंत्रज्ञान आणले आहे. या माध्यमातून संगीत शिक्षणाला औपचारिक स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहे. जग जसजसे डिजिटल होत जात आहे, तसतसे मुले व पालकांनी संगीत शिक्षणाचा पर्याय निवडणे अधिक महत्त्वाचे होत आहे. विद्यार्थ्यांना माननीकृत चाचण्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करता यावी आणि भविष्यकाळात नोकरीच्या संधींसाठी आवश्यक कौशल्ये प्राप्त करता यावीत या दृष्टीने लर्न बडी प्रयत्नशील आहे.

लर्न बडी हे तंत्रज्ञान शालेय शिक्षकांना सहाय्य करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. याद्वारे व्हिडिओवर आधारित वातावरण निर्माण केले जाते आणि त्यात त्यांनामास्टर स्क्रीनच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवता येते व त्याला/तिला इम्प्रोवाइज करण्यात मदत करता येते. विद्यार्थ्यांना संगीताची निर्मिती कशी करायची तसेच संगीत समजून कसे घ्यायचे हे यशस्वीरित्या शिकता येते. यामुळे संगीत शिक्षणाला औपचारिक स्वरूप देण्यात तसेच तरुण संगीतज्ञांना नवीन कौशल्ये शिकण्याच्या संधी पुरवण्यात मदत होणार आहे. शिक्षक किंवा इन्स्ट्रक्टर संगीताचा एक भाग निवडू शकतात आणि तो वर्गाला असाइन करू शकतात. संगीताचा प्रत्येक भाग सात भागांत विभागला जातो (लोकप्रिय गाण्यांतून निवडलेला भाग). फर्टाडोस स्कूल ऑफ म्युझिकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संस्थापक श्रीमती तनुजा गोम्स भारतातील प्रगतीशील संगीत शिक्षणाबद्दल मत व्यक्त करताना म्हणतात, “भारतात संगीत शिक्षणाच्या महत्त्वाकडे बहुतेकदा दुर्लक्ष केले जाते. संगीत हे एक कलेचे माध्यम म्हणून अत्यंत प्रगतीशील स्वरूपाचे आहे.

लर्न बडीच्या माध्यमातून संगीत शिक्षण हा शाळेतील पायाभूत विषयांपैकी एक म्हणून विकसित करता येईल आणि मुलांना विचाराचा एक नवीन मार्ग देता येईल, अशी आशा आम्हाला वाटते. फर्टाडोस स्कूल ऑफ म्युझिकच्या सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती धरिनी उपाध्याय म्हणाल्या, “भारतातील शिक्षण प्रणाली उत्क्रांत होत आहे आणि एनईपी २०२० मुळे आता विद्यार्थ्यांची नवीन पिढी वैविध्यपूर्ण कौशल्य श्रेणी आत्मसात करू शकेल, इंजिनीअरिंग आणि डॉक्टरेट्स यापलीकडे विचार करू शकेल. संगीत शिक्षणासारख्या घटकांचा अभ्यासक्रमात समावेश केल्यास विद्यार्थ्यांना भविष्यकाळासाठी मौल्यवान कौशल्ये शिकण्यास मदत होऊ शकेल. लर्न बडीच्या माध्यमातून संगीत शिक्षण प्रक्रियेला इयत्तावार पद्धतीने वेगदेता येईल अशी आशा आम्हाला वाटते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button