आरोग्य

दिल्लीसह ६ राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्यांकडे आरटी-पीसीआर अहवाल बंधनकारक

मुंबई : देशासह राज्यात कोरोनाचा कहर सुरू असून दिवसेंदिवस बाधितांचा आकडा वाढत आहे. कोरोनाचं थैमान रोखण्यासाठी रविवारी दिल्लीसह काही राज्ये संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये केरळ, गोवा, गुजरात, दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानीचं काही क्षेत्र, राजस्थान आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार, या सहा राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना रेल्वेमध्ये प्रवास करण्यापूर्वी ४८ तास आधी केलेल्या आरटी-पीसीआर (RT-PCR) टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह दाखवणं बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

दिल्लीत महाराष्ट्रातून येणार्‍या प्रवाशांच्या आरटी-पीसीआर रिपोर्टचा तपास करण्यात अपयशी ठरल्याबद्दल चार विमान कंपन्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानुसार, विस्तारा, इंडिगो, स्पाइस जेट आणि एअर एशिया या चार विमान कंपन्यांविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहेत. या प्रकरणी अद्याप या चार एअरलाइन्सकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नसल्याचे सांगितले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button