मनोरंजन

राज कुंद्राची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी

मुंबई – बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. त्याच्यावर अश्लील फिल्म्स तयार करणे आणि त्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा आरोप आहे. या प्रकरणात सातत्याने नव-नवे खुलासे समोर येत आहेत. आता न्यायालयाने त्याला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.

पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा अद्यापही दिलासा मिळालेला नाही. आता त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. राज कुंद्राला किला कोर्टाने 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. याच बरोबर राज कुंद्राच्या वकिलांनी त्याच्या जामीनासाठी अर्ज केला आहे. चौकशी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता राज कुंद्राला जामीन मिळावा, असा या अर्जाचा आधार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button