मनोरंजन

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात खलनायकी भूमिका साकारणाऱ्यांचे जबरदस्त नृत्याविष्कार

मुंबई : आपलं कुटुंब आपला सोहळा अर्थातच ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार’ सोहळ्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. ४ एप्रिलला संध्याकाळी ७ वाजता हा रंगारंग सोहळा पहाता येणार आहे. पुरस्कार कोणत्या सदस्यांना मिळणार याची उत्सुकता आहेच पण त्यासोबतच स्टार प्रवाह परिवारातल्या सदस्यांचे धमाकेदार परफॉर्मन्सेस पाहायला मिळणं ही अनोखी पर्वणी असणार आहे. या सोहळ्यात स्टार प्रवाहवरील मालिकांमध्ये खलनायकी भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी जबरदस्त नृत्याविष्कार सादर करत कार्यक्रमाची रंगत वाढवली आहे. आई कुठे काय करते मालिकेतील अनिरुद्ध, रंग माझा वेगळा मालिकेतली श्वेता, सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील शालिनी, मुलगी झाली हो मालिकेतले विलास पाटील आणि स्वाभिमान मालिकेतील सुपर्णा सुर्यवंशी यांचा अनोखा अंदाज या सोहळ्यात पाहायला मिळणार आहे.

या अनोख्या नृत्याविष्कारासोबतच स्टार प्रवाह परिवार पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट जोडी, सर्वोत्कृष्ट आई, सर्वोत्कृष्ट मुलगी, सर्वोत्कृष्ट सासू, सर्वोत्कृष्ट खलनायक, सर्वोत्कृष्ट कुटुंब, सर्वोत्कृष्ट मालिका, सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा, सर्वोत्कृष्ट विनोदवीर, सर्वोत्कृष्ट वहिनी, सर्वोत्कृष्ट स्टायलिश जोडी, सर्वोत्कृष्ट सन्माननीय सदस्य, सर्वोत्कृष्ट रोमॅण्टिक हिरो अश्या वेगवेगळ्या विभागात चुरशीची स्पर्धा असेल. मंगल केंकरे, भरत जाधव, वैजयंती आपटे, श्रीरंग गोडबोले, मिलिंद इंगळे या दिग्गजांनी स्टार प्रवाह परिवार पुरस्काराच्या परीक्षणाची जबाबदारी पार पाडली आहे. स्टार प्रवाह परिवार पुरस्कारांचं हे पहिलंच वर्ष असल्यामुळे सर्वच सदस्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण आहे. तेव्हा या खास सोहळ्याचं खास आमंत्रण आहे. पाहायला विसरु नका ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार’ रविवार ४ एप्रिलला संध्याकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button