मेलबोर्न : क्ले कोर्टचा अनभिषिक्त सम्राट असणाऱ्या स्पेनच्या राफेल नदालने ऑस्ट्रेलियन ओपनचा अंतिम सामना जिंकत आणखी एक ग्रँड स्लॅम खिशात घातलं आहे. त्याने इतिहासात सर्वाधिक म्हणजेच २१ ग्रँडस्लॅम मिळवले आहेत. टेनिसपटू राफेल नदालने अंतिम सामन्यात रशियाच्या डॅनिल मेदवेदवला मात देत दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच जेतेपद पटकावलं आहे. अतिशय अटीतटीचा झालेला सामना जवळपास पाच तासांहून अधिक काळ चालला. ज्यात पाच सेट्समध्ये राफेलने विजय मिळवला.
राफेलने २-६, ६-७, ६-४, ६-४ आणि ७-५ अशा फरकाने विजय मिळवला. विजेतेपदासह नदालच्या खात्यात आता सर्वाधिक २१ ग्रँडस्लॅम जेतेपदे झाली आहेत. असा विक्रम करणारा तो जगातील पहिला टेनिसपटू ठरला. टेनिसमधील रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोविच या दिग्गजांच्या नावावर प्रत्येकी २० ग्रँडस्लॅम जेतेपदे आहेत. अंतिम सामन्यात रशियाच्या मेदवेदेवने सुरुवात तर उत्तम केली. त्याने पहिले दोन सेट्स जिंकले देखील पण अनुभवाच्या जोरावर अखेरचे तिनही सेट्स नदालने जिंकत जेतेपद पटकावलं आहे.
https://twitter.com/AustralianOpen/status/1487791222299242502
ऑस्ट्रेलियन ओपनचा हा सामना एखाद्या अंतिम सामन्याला अगदी साजेशा झाला. सुरवातीपासून अखेरपर्यंत उत्कंठा वाढवणारा हा सामना राफेलने जिंकला असला तरी डॅनिल याचा खेळही उत्कृष्ट होता. सामन्यात पहिल्या सेटमध्ये डॅनेलने नदालला ६-२ अशा मोठ्या फरकाने पराभूत केले. दुसरा सेटही डॅनेलने जिंकला पण यावेळी राफेलने कडवी झुंज दिल्यामुळे डॅनिलने ६-७ ने सेट जिंकला. तिसऱ्या सेटमध्येही डॅनेल जिंकेल असे वाटत असताना राफेलने कमबॅक करत अप्रतिम खेळ दाखवला आणि सेट ६-४ ने जिंकला. चौथा सेटही ६-३ ने जिंकल्यानंतर अखेरचा निर्णायक सेट राफेलने ७-५ ने खिशात घालत सामन्यासह स्पर्धा जिंकत इतिहास रचला.
Rafael Nadal becomes the first men's player to win 21 Grand Slams, defeats Daniil Medvedev 2-6, 6-7, 6-4, 6-4, 7-5 in the final to win his second #AustralianOpen title
(File photo) pic.twitter.com/YkVVTB92l0
— ANI (@ANI) January 30, 2022
नदालचे जबरदस्त पुनरागमन
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सुरुवातीला मेदवेदेवने आघाडी घेतली होती. परंतु मेदवेदेव विरुद्ध नदालने जबरदस्त पुनरागमन केलं. नदालची सुरुवात चांगली झालेली परंतु नंतर कामगिरी कमी पडल्यामुळे पिछाडीवर आला होता. पाचव्या सेटमध्ये कधी नदाल तर कधी मेदवेदेव आघाडी घेत होता. पाचवा सेट फारच रोमांचक ठरला. परंतु अखेरिस निर्णायक सेटमध्ये ७-५ अशी आघाडी घेत राफेल नदालने २१ व्या ग्रँड स्लॅमवर आपलं नाव कोरत नवा इतिहास रचला आहे.
नदालने फेडरर, जोकोविचला मागे टाकले
राफेल नदालने स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर आणि सर्बियाच्या नोवाक जोकोव्हिचला मागे सोडलं आहे. ज्यांनी आपल्या कारकिर्दीत २० वेळा ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले आहे. नदालला ऑस्ट्रेलिया ओपन सुरु होण्यापुर्वी पायाची दुखापत झाली होती. तसेच तो कोरोनाबाधित झाला होता परंतु नदालने स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवले आहे. इटलीच्या मॅटेओ बेरेटिनीचा पराभव करून ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.