नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यामध्ये आज फोनवरून झाल्याचे झाल्याचे समजते. दोघांमध्ये आपापल्या देशांमधील कोरोना परिस्थितीबाबत चर्चा झाली. मोदींनी सांगितले की, अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत कोरोना संकटाबाबत बातचित झाली. आज संध्याकाळी त्यांची जो बायडेन यांच्यासोबत फोनवरून बोलणे झाले. या संकटात भारताला साथ दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बायडेन यांचे आभार मानले.
यापूर्वी रविवारी एमएसए अजित डोवाल यांनी अमेरिकेच्या एमएसए जेक सुलिवन यांच्याशी बातचित केली होती. ज्यानंतर अमेरिका कोरोना लसीच्या कच्चा मालावरील निर्यातीवर लावली रोख हटवण्यास तयार झाले होते.
पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यामध्ये कोरोना लस, औषध आणि आरोग्य साधनांच्या पुरवठ्याबाबत चर्चा झाली. यादरम्यान जो बायडेन यांनी या कोरोनाच्या संकटात अमेरिका भारतसोबत असल्याचा विश्वास दाखवला. ते म्हणाले की, अमेरिका व्हेंटिलेटर आणि इतर साधन भारताला देईल. शिवाय कोविशिल्ड लसीच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्चा माल लवकरात लवकर उपलब्ध केला जाईल. याबाबत मोदींना जो बायडेन आणि अमेरिकेचे आभार मानले. मोदींनी यावेळी लसीच्या मैत्रीबाबत देखील सांगितले की, कोवॅक्स आणि क्वाड लसीच्या पुढाकाराच्या माध्यमातून भारत दुसऱ्या देशांना कोरोना लस उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे लस आणि औषध तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा सुनिश्चित करावा, असे मोदी बायडेन यांना म्हणाले.