राजकारण

विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना मदत करा : प्रवीण दरेकर

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा गेल्या दीड वर्षापासून बंद आहेत. त्यामुळे विनाअनुदानित शाळांमधीलशिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. फक्त शिक्षकच नाही तर त्यांचे कुटुंबीयही या संकटातून जात आहेत. कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरु होईपर्यंत, विनाअनुदानित शाळेतील सुमारे ५० हजार शिक्षकांच्या कुटुंबांना तातडीने मदत करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

प्रवीण दरेकर यांनी यासंदर्भातील पत्र आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. या पत्रात कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा सुरू होईपर्यंत विनाअनुदानित शाळेतील सुमारे ५० हजार शिक्षकांच्या कुटुंबांना तातडीने मदत करण्यात यावी, असे म्हटले आहे. हे पत्र प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री कार्यालय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. शाळा बंद असल्याने विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांची परिस्थिती विदारक असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील शिक्षकांच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे, असे सांगत प्रवीण दरेकर यांनी यासंबंधी आणखी काही मुद्दे पत्रात मांडले आहे.

याचबरोबर, प्रवीण दरेकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरही भाष्य केले आहे. तात्पुरती ठिगळं लावून एसटीचे कर्मचारी सुखी होणार नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करायला हव्यात. कर्मचारी आजही उपासमारीत जगत आहेत. मुख्यमंत्र्यांनीच कायमस्वरूपी मार्ग काढायला हवा. तर अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button